पान:आत्मविचार.djvu/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. दो क्रमी चित्तनाशस्य योगो ज्ञानं च राघव योगो वृत्तिनिरोधो हि ज्ञानं सम्यगवेक्षणम् ।। विवेकविचारे आपण आपल्या स्वरूपास गुरु शास्त्रमार्ग यथार्थ जा- णून, देहाध्यास सोडून, चित्ताचें जें अखंड समाधान, त्यास ज्ञान ह्मणतात; आणि चित्तांतःकरणेंद्रियांचा बलात्कार रोध, निर्विषय करणे, त्याबद्दल जी जी क्रिया, त्यास कर्म झटले आहे. ह्मणजेः- सुखदुःखप्रदो नान्यः पुरुषस्यात्मविभ्रमः॥ सर्व दुःखास मूळ पुरुषाचा मनोभ्रमच आहे. समाहितं यस्य मनः प्रशांतं ॥ दानादिभिः किं वद तस्य कृत्यं ।। असंयतं यस्य मनोविनश्ये॥ छानादिभिः श्चेदपरं किमभिः ॥ जर विवेकविचारे मन शांत आहे, तर नप, तप, बत, दानादिकांत विशेषत्व काय ? जर वासनेने मनादिक दृश्चित आहेत तर सर्व करूनही निष्फळ. वस्तुतः दानं स्वधर्मो नियमो यमश्च ॥' कृतानि कर्माणि च सद्ब्रतानि ॥ सर्वे मनोनिग्रहलक्षणीयाः॥ परो हि योगो मनसः समाधिः ॥ दान, धर्म, यम, नियम, जप, तप, व्रतादिक सर्वांचे सार मनोनिग्रह होय. एवं निर्वासन मन झाल्याम स्थिरविचारे आत्मज्ञान व दृज्ञाने सर्व दुःख (65)-६