४० आत्मविचार. तावत् शुभाशुभकर्म व तज्जन्य पुण्यपाप निवृत्ती नसून पुण्यपाप असे पर्यंत देहोत्पत्तिविनाश होणे चुकत नाही, आणि राग द्वेष असे पर्यंत कमें होत असून ती राग द्वेष अज्ञान जनित आहेत एवं सर्व दुःखाचें बीज अज्ञान आहे कारण सकल प्रपंच व त्याचे सत्यत्व ज्ञान भान अज्ञानका- लीच असते जसे स्वप्न जग जोपर्यंत दिसते व जागृती नसेपर्यंत ते आपणाहून भिन्न व सत्यच वाटते तसे स्वस्वरूप अज्ञानही स्वप्नवत आहे त्यांतून ज्ञान जागृती नसेपर्यंत सर्व सत्यत्वे इहपरलोक दुःखें सुटत नाहीत तात्पर्य अज्ञानामुळे मनेंद्रिये विषयाकडे साहजीक जातात ह्मणजे विषयाकार होणे हे त्यांचे स्वाभाविक धर्मच होत यास प्रारब्धच कारण असते असें सदोदीत नाही. ते मनेंद्रियें अविचान्यास देहक्रियेकडे अधिक ओढून नेतात यास्तव विवेकाने त्यांचे आकलन करून निःशेष अज्ञान नाश करून सतत स्वस्वरुपाकार राहिले पाहिजे हेच सर्वांत उत्तम श्रेष्ट सुख असा ज्यास विवेक होतो तोच जिज्ञासु, वैराग्यशील, मुमुक्षु, ज्ञाना. धिकारी होय असे स्पष्ट होत आहे शिवाय सर्वत्र जर विषयसुखच इच्छितात ह्मणावे तर सुषुप्तिमुखाची इच्छा कोणास झाली न पाहिजे कारण सुषुप्तीत कोणताच विषय नाही; यावरून विषयवृत्तीरहित में सुख तेंच निरतिशयानंदरूपसत्य; आणि सर्वत्र पुरूष पण अत्यंत सुखाची इच्छा करितात तस्मात् सर्वत्र पुरूष आत्मलाभ नित्य सुखच इच्छितात असें होत आहे. प्र० निरंतरसुखप्राप्तीस व अत्यंतदुःखनिवृत्तीस काय साधन, कितीप्र- कारें, कसे आहे. स० अत्यंतसुखप्राप्तीस व अत्यंतदुःखनिवृत्तीस मूळ दोनच मार्ग सांख्ययोग, (ज्ञानकर्म ) असे आहे
पान:आत्मविचार.djvu/६०
Appearance