पान:आत्मविचार.djvu/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहार, निद्रा, भय, मैथुन, हे जंगम प्राणिमात्री समान असून ज्ञान हैं मनुष्यांत विशेषत्व आहे त्या ज्ञानाचा जर यथार्थ उपयोग न केला तर पश्वादिक व मनुप्यांत आकृतिमात्रच भेद; अन्य नाही, ह्मणूनच सुखाची इच्छा करीत असून ती इच्छा पूर्ण न होतां निरंतर दुःखी रहातात! अनेक पुरुष सुखप्रात्प्यर्थ धन, पुत्र, कलत्रादिकांचे ठिकाणी सुख आहे असे समजून तत्संपादनार्थ अहोरात्र यत्न करतात व दुःखनिवृत्यर्थ मंत्र, तंत्र, तप, दान, योग, याग, कर्मोपासनादिकाचा आश्रय घेतात तथापि दुःखनिवृत्ति, सुखप्राप्ती होत नाही. कारण व्याधी न ओळखून जो उपचार तो अधीक विकृति मात्र करतो. जसा कोणी पुरूष अफू, भांग, मदिरादिकांचे अधिक सेवन ठेवून तद्योगें अतिमुख समजतो पण ज्यास्त दुःखीच होतो तद्वत् जे पुरूप सुखप्राप्ती, दुःखनिवृत्तीस्तव जगांतील तुच्छ पदार्थाचा आश्रय घेतात ते ज्यास्त दुःखाचे अनुमती मात्र होतात. जसा मृग- स्वसुगंधमवध्वैणम्तृणेषु भ्रमते यथा स्वरूपानंदमज्ञात्वा नया भोगेष्वबुद्धयः आपले कम्नुरीचा सुगंध आपलेच जवळ आहे हे न जाणून भ्रान्तीनं अन्य कन्री शोधीत फिरतो, नसे सर्व पुरूप स्वस्वरूपानंदसुख आपलेच ठिकाणी आहे हे न जाणून भ्रांती कल्पित जगद्विषयांत सुख- लाभाची इच्छा करतात परंतु गुप्तधन घरांत असून भ्रान्तीने वाहेर पाहूं- गेले किंवा कोणी ग्राम पूर्वेस असून तेथे जाण्याच्या हेतूनें जर पश्चिमेचा मार्ग धरला तर ते कसे मिळते ? तसेच वर दर्शित केलेले जे सुखमातीचे मार्ग ते अयुक्त असल्याने सर्व पुरुषांच्या इच्छा अपूर्ण रहातात. १स्त्री.