पान:आत्मविचार.djvu/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या अत्यंतदुःखनिवृत्ति अखंडसुखप्राप्तीस खरे सुख कोणते व तत्माप्तीचे साधन काय हे यथार्थ समजून तोच यत्न करणे युक्त. तें निरतिशयानंद- सुख आत्मलाभाविना नसून तत्प्राप्तीस आत्मज्ञानच संपादन केले पाहिजे, याविना अन्य कोणत्याही उपायाने निःशेषदुःखनिवृत्ति निरंतर सुखानंद- प्राप्ती कधीच होणार नाही. महान् आश्चर्य आहे की,जे पुरूष समुद्राची गंभीरता,वायुवेगें जल,अग्नी, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, आकाश, पृथ्वी, पर्वतादिक अनेक शोध करतात पण आपले स्वरूपाचा शोध करीत नसून जसे बुद्धिरहित पश्वादिक प्राणी आपणास न जाणून आहार, निद्रा, मैथुन, भय, अनुभवून अनेक भार वहातात व दुःखांतच मृत होतात, तसेच हे सत्रुद्दमानवप्राणी प्रपंचभार वहाण्यांत अहोरात्र कालक्षेप करीत असून आत्मक्षयाचा काहीच विचार न पहातां दुनियेत आले तसेच जातात. गम्मत अशी की या जगांत कितीक रावसाहेव नानासाहेब मी मी ह्मणत मोठ्या ऐटीने वागतात आणि प्रपंचांतील अनेक बारीक शोध काढतात व कितीएक उलाढाली करतान, तरी हाडे, मांस, चर्म, प्राण, मनेंद्रियादिकांपैकी नाना- साहेब ह्मणवीत कोण मिरवतो व ही विशेषणे कोणास हे त्या नाना- साहेबांस समजत नमून दुनियेत बहुतेकांसही कारण नाही मात्र अनेकगुण- समुच्चयास पदार्थ ह्मणून जसा जगांत व्यवहार चालतो तसा अस्थिचर्मादिक संघीतच केवळ मी हाणत असतो आणि जमा कोणी पुरुष वेश्यागौरी विषयमुखीं निमग्न असतां इकडे आपले गृहाल अनी लागला हे जाणत नाही किंवा मद्यपी आपला ठेवा हरण झाला हे समजत नाही, तद्वत्- · आदित्यस्य गतागतैरहरहः संक्षीयते जीवितं व्यापारैर्वहुकार्यभारगुरुभिः कालोन विज्ञायते १ दिवसरात्र. २ अनेक गुगाच्या वस्तंचे मिश्रण. ३ समुदाय. ४ घरी.