आत्मविचार. नादासक्तं मग व्याधश्विनति निशितैः शरैः रूपासक्तं नरं नारी रतियुरिकयासकृत् ॥ नादासक्तमृग ब्याधहस्ते मृत होतो तद्वत रूपासक्तपुरुषास नारी सुरी- त् होते. यानंतर वार्धक्यदशेत आधि, व्याधि, निःशक्तता, कंप, दुर्गध, पर्वगात्रशिथिलता, सर्वेद्रियक्षीणत्व व तृष्णाक्रोधास तारुण्य, तद्योगें शरीर राहण्याची आशा, वित्तेच्छा, नानाभोगवासना, त्यामुळे अप्रतिथ विटंबना पात्र होत असून- मृत्युः शरीरगोसारं वसूरक्षं वसुंधरा दुचारिणी च हसते खपति पुत्रवत्सलं ॥ देहरक्षकास मृत्यु, वित्तरक्षकास गृथ्वी, पुत्रलालनकरणान्यास दुरा चारिणी स्त्री, ही हंसत असतात आणि- मार्गेषु मिलिताचोराः सख्यं तैः सहधित ते गता धनमादाय पश्चाच्छोचति मंधीः॥ मार्गी जातां चोरसमुदाय भेटला त्यांच्याशी अविचारें सख्यत्व करून संगत धरली तर तेच सर्वस्व हरतात तसेंच स्त्रीपुरुषादिक पुण्य वित्त, हरून जातात व याचे वाट्यास दुःख मात्र येतें सारांश- दीर्घमायुर्जरा मुक्त धनं भूरि दुराधये कलन पुत्रं दुःखाय संसारे सुखमद्भुतं ॥ दीर्घआयुष्य हे वृध्धावस्थेत दुःख भोगार्थच नेमिले असते. अन्य काही उपयोग नाही ह्मणजे धनवनादिरक्षणचिंता पुत्रकलत्रादिचे दुःशब्द, दुराचरण, आधिव्याधिदुःख, अमके मृत झाले, अमके पदार्थ नासले, हे पहात मात्र बसणे याउपर
पान:आत्मविचार.djvu/५५
Appearance