पान:आत्मविचार.djvu/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. ब्रह्मात्मकत्वयोन मोक्षः सिध्यति नान्यथा न कर्मणामनुष्ठानैर्न दानैस्तपसापि वा केवल्यं लभते मर्त्यः किं तु ज्ञानेन केवलम् ॥ देहात्मवुद्धीने, जपतपादिकें, संसारदुःखें दूर न होतां, दुःखाचें साधन देहाभिमान मात्र ज्यास्त वृद्धी पावतो झणजे ज्या रोगाची उत्पत्ती अज्ञानापासून त्यास ज्ञानौषधीवांचून अन्य क्रिया उपाय व्यर्थ जसा रज्जु अज्ञाने सर्प भासला, तो रज्जु ज्ञानाविना मंत्र, तंत्र, दंड प्रहारादिक क्रियेनें दूर होणार नाही किंवा सूर्य रश्मी न जाणण्याने जलाभास होतो त्याची निवृत्ती ज्ञातव्यतेने होते, कर्तव्यतेने नाही. तशीच सर्व दुःखें अज्ञानोद्भुत असून या अज्ञानाचे मूल भ्रान्ती आहे. भ्रांतीची निवृत्ती विचाराने होते क्रियेनें नाहीं यास्तव दुःखोत्पत्तीचे साधक में अज्ञान त्याचा नाश झाला पाहिजे तरच अशेष दुःखं दूर होऊन पुन्हा उद्भव न होतां निरंतर सुग्व प्राप्ती होत आहे ह्मणून ज्ञानापेक्षा कारण होय. प्र० सर्वत्र पुरुष पंचविषयसुखभोगेच्छा करीत असतात व कित्येक विषयभोग त्याग करून तपारूढ असतात, ते परलोक भोगेच्छेनं असतात. एवं इह परलोक विषयभोगच सर्वत्र इच्छितात असे दिसते. ती विषय मुखें मोक्षांत नाहीत यास्तव मोक्ष व मोक्षाचे साधन कोणी इच्छीत नसून ज्ञानाधिकारी पण कोणी होत नाही असे होत आहे. स० पुरुष चार प्रकारचे असतात; मुक्त, पामर, विषयी जिज्ञासु, यांत निर्वासना, निरभिमान ज्ञानामृतें, नित्य, तृप्त, ते मुक्त होत, शास्त्रसं- स्कार रहित इह परलोक संबंधी विषयभागासक्त यत्न करणारे ते या लोकी अतृप्त दुःखी रहात असून परलोक सुखाचे साधन करीत २ किरण, ३ जाणण्याने. ४ क्रियतें. ५ अज्ञानापासून.