Jump to content

पान:आत्मविचार.djvu/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविनार. शरीरध्यासें दुःख. असे हे प्रवृतिचक्र फिरत असून याचे मूळ अज्ञान आहे ते नष्ट झाल्याविना दुःख नाश होत नाही जसा कोणी वृक्ष निःशेष काढून टाकणे आहे तर त्याचे मूळच उपटले पाहिजे मूळ ठेवून शाखा तोडल्यास पुन्हा उद्भव होतो व जसें मुळाधारे वृक्ष, स्तंभाधारें गृहेर होतात तसें अज्ञानाश्रित सर्व दुःखें रहात आहेत एवं संपूर्ण दुःखाचें मूळ अज्ञान आहे तस्मात ज्यास अत्यन्त दुःखनिवृत्ति नित्य सुखप्राप्तीची खरी इच्छा आहे त्यास जगत् अज्ञान निवृतीची इच्छा संभवत असून प्रयोजन होत आहे. प्र० अध्यात्मादिक तिन्ही दुःखें दूरी करण्यास शास्त्रांत मंत्र तंत्र जप, तप, दान, योग, याग, औषधादिक, उपाय सांगितले आहेत जशी भोजनानें क्षुधादुःखाची निवृत्ति, तशी आपापल्या उपायें सर्व दुःखें निवारण होतात तर मग ज्ञानांपेक्षा काय कारण! स० तिन्ही दुःखं नाशार्थ शास्रोपाय बोधन केले तथापि त्याने सर्व दुःखें निःशेष नाश न होतां मुळांत बीजवत् गुप्त राहून समय परत्वें पुन्हा उद्भव होतात; किंवा त्या रूपे जाऊन अन्यरूपे येतात व सर्वात मोठे दुर्निवार्य जन्ममरणरूप दुःख निवारण्यास कोणीच शक्य नाही. या जगांत आधिव्याधी इत्यादि अनेक प्रकारची दुःखे असून त्यांचा परिहार पण आहे तत्रापि सर्वच हटकून निःशेष नाश होत नाहीत पण हा भवरोग तमा नमून यावर ज्ञानोषधी विना अन्य उपायचं नाही . अज्ञानसर्पदष्टस्य ब्रह्मज्ञानौषधं विना किमु वेदैश्च शास्त्रैश्च किनु मंत्र:किमौषधैः ।। नयोगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया १ आधारे.