Jump to content

पान:आत्मविचार.djvu/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. २७ असून दर्पण जलादिकांत प्रतिबिंबित होतो व शिलादिकांत प्रतिबिंबित नाही याचे कारण स्वच्छास्वच्छता होय. सूर्याकडे प्रीती द्वेष नसतो तसा ईश्वर सर्वी समान असून जेथे पापाचरणाने बुद्धी मलीन, तेथे ईश्वरानुग्रह नसून जेथें पुण्यरूप निर्मळता तेथें अनुग्रह दिसतो या प्र- कारें अंतर्यामी ईश्वर जीवास फल देतो शिवाय सुखदुःखभोग पूर्वकर्मा- न्वयें अवश्य होणार असे मानले तरी अभिमानाने कोणतेच कर्म केले न पाहिजे; पण तसे नसतां काहीवेळ मी कर्ता व कोणीवेळ मी अकर्ता, झणजे विषय भोगार्थ अनेक यत्ने कर्म, व मोक्षार्थ अयत्ने प्रारब्ध लावणे हे कसे बनेल ? तात्पर्य जीवास अज्ञान तावत् ईश्वर नियामक असून कर्मफल देतो व जिकडे त्याची प्रवृत्ति तिकडे तसें प्रेरण ह्मणजे बुद्धिप्रकाशित करतो त्यांत पूर्वकर्मानुरूप ज्या ज्या काली जे जे भोग ते ते तसे त्यास अचूक घडतात, व वर्तमानकर्माचे फल न होतां देहाहं- तेने तेंच कर्मक्रियमाणरूप होऊन संचितांत जमा होतां भांवि जन्मास कारण होत असते. आतां जीवकृत काहीच फल होत नसून पूर्वकर्म पराधीनत्वेंच सर्व घडते असे मानले तर पुण्यकर्ते स्वर्गी पापकर्ते नरकी गेले न पाहिजेत आणि पुण्याचरणी पुण्यवान सुखी पापाचरणी पापी दुःखीच निरंतर होऊन राहतील, मग त्यांची सुटका कशी होणार परंतु असा नियम सृष्टीत व शास्त्रांत दिसत नाही. पुण्यात्माही दुराच- रणाने पापी, दुःखी; पापीपण पुण्याचरणाने पुण्यवान, सुखी; अनामिळ वाल्मीक यांचे उदाहरणावरून अनुभवी येतात आणि पूर्वकर्म पण या जीवाचेंच केलेले असते, अन्याचे नाही. जशी सर्व प्रजा राजाची असून त्यांत काही लोकांसच राजसत्तेचा अधिकार राजाकडून मिळाला असतो तेवढा ते बजावितात तद्वत् चौऱ्यांशी लक्ष योनीतील जीवांपैकीं मना मात्र मोक्षसंपादनार्थ स्वतंत्रता मिळाली आहे जर त्याग १ पुढे येणार.