Jump to content

पान:आत्मविचार.djvu/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मात्मविचार. मार्थिक नसून कल्पित किंवा औपाधिक आहे, यामुळे केवळ स्वतंत्र परतंत्र मणतां येत नाही तथापि स्वस्वरूप अज्ञानामुळे, वासना, वासनेमुळे, कर्म, कर्मामुळे परतंत्रता, असें सवासना में कर्म तेंच बंधास हेतु असतां, श्रम व्यर्थ जातो व परमार्थ यत्न निष्फळ नाही कारण देहादि सर्व संघ आविद्यक असून सात्विक कर्माने पुण्योत्पत्ति राजसाने पापोत्पत्ति त्या पुण्यपापाचा सुखदुःख भोग भोगांती पुन्हा कर्म, असे राहाटगाडगें सत्तत चालत असून सर्व दुःखाचें हेंच बीज होय व ईश्वर याहून निराळा निरीच्छ, असंग आहे, म्हणून मोक्षेच्छूने निष्कामकर्मरूप गुरु- शास्त्रमार्गे विचारयत्नच केला पाहिजे. प्रारम्याने सुखदुःख भोग घडतात परंतु मोक्षसाध्य होत नाही. प्र० गुरु ईश्वर देवताप्रसादानें अप्रयासे कितीक सुखी व मुक्त झाले असे श्रवणी येते आणि कृतकर्म भोगल्यावांचून क्षय नाही तदनुसार ईश्वरफल देतो व प्रेरण करितो असें श्रुति शास्त्रेही ह्मणतात यावरून कर्माप्रमाणे जीव पराधीनच दिसतात; तर पुरुषप्रयत्न वृथाच होय. स० गुरु ईश्वर देवतादिक प्रसाद · जीवाच्या कृतयत्नाने होतात आपले यत्नाविना गुर्वादिक कोणास मुक्त, सुखी, करीत नाहीत जर अप्रयासे प्रसन्न होते तर पशू तिर्यगादिक या सर्वांस मुक्त का करीत नाहीत एवं विचारं पाहतां नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुखंति जंतवः ॥ स्वरूपलाभे पूर्णकामईश्वरास जीवांचे पुण्यपाप, सुखदुःख भोग देण्याघेण्याची इच्छा नसून दंड अनुग्रह ही विषमता पण नाही तर स्वअज्ञाने मोहित नीव त्यावर आळ घालतात जसा सूर्य सर्वत्र समान