Jump to content

पान:आत्मविचार.djvu/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. होऊन तेंच पूर्वसंचित बीज भाग्योदयकाळी वृक्षरूप होऊन सुख दुःख फल देण्याची त्याची जी जशी वेळ येईल ती तशी फलें न इच्छिता पण देणार. एवं भोगार्थ आयास निरर्थक; यास्तव विक्याने सूर्योदयी जागृती आल्यापासून निद्रेपर्यंत परलोकप्राप्तिविषयींच चिंता करावी हे योग्य. कारण इहलोकसंबंधी सुखदुःखेतर नेमलेलीच आहेत ती तशी घडणारच. मम तदर्थ आयुष्य खर्ची घालणे किमर्थ. अरे वासनायुक्त जी जी क्रिया तीच भाविनन्मास हेतु असून प्रवृत्तिचक्र भ्रमणास मूळ बीज आहे एवं. यस्य तृष्णा न विश्रांता दारित्र्यं तस्य वैध्रुवं । जेथें वासना तेथेंच सर्व दुःखें परंपरेनें रहात असून विषयाशामहापाशाद्यो विमुक्तः सुदुस्त्यजात् स एव कल्पते मुक्त्यै नान्यः पदशास्त्रवेद्यपि ॥ या विषयाशारूप महापाशांतून जो मुक्त तोच ज्ञानद्वारे मुक्त होतो इतर महापंडित असताही मुक्त होत नाही. विष जो जो अधीक वाढेल तो तो प्राणप्रयाणसमय निकट; तसं जो जो विषयवृद्धी तो तो दुःख ज्यास्त ह्मणून विचारी पुरुषाम दुःखनिवृत्यर्थ वामनाक्षयादि उपाय करणे योग्य; त्याने ज्ञानप्राप्ति व दृढज्ञाने मुक्तता होत आहे. .प्र.-संचितादिक कर्माचे रूप काय आणि जर - प्रारब्धानेच सर्व घडत आहे तर मोक्षार्थ आयासही नको कारण देहपातान्ते में में कर्म व भोग ते ते प्रारब्धपराधीनत्वे घडतात असे परतंत्रत्व असतां जीवास बंधमोक्ष, सुखदुःख, किन्निमित्त; जर जीव स्वतंत्र ह्मणावे तर त्यांचे इच्छे- वाचून त्यांस सुखदुःखे होतात ती झाली न पाहिजेत व परतंत्र झटले तर १ कारण. २ नाशपर्यंत.