पान:आत्मविचार.djvu/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. च विषय, मात्र विषवत् दुःखप्रद आहेत या निश्चयबळें प्राप्तामाप्ति जे पुरूष प्रिति, द्वेष त्याग करतात ते विषयपाशांतून मुक्त होतात. विचारे पहातां मनांत विषय विषयांत मन, असा परस्पर संबंध होऊन रागद्वेषाने ज्या ज्या क्रिया घडतात त्याच बंधास हेतू असून अविचारच त्यांचे मूळ आहे यास्तव देह प्राण मनेंद्रियादिक अचेतन केवळ जड व आत्माचैतन्य मात्र निराकार, अविकार, असंग. या प्रकारे उभयत्वी क्रिया व भोगाचा अभाव असून अहंकारयोगें मी कर्ता, भोक्ता, मिथ्या भ्रान्ति आहे याचा पुढे विवेचन प्रसंगी स्पष्टार्थ होईल. त्या निश्चयबळे स्वात्म्यास जो असंग अक्रिय अभोक्ता जाणतो त्यास मीपणा या अहंकाराने विषयेद्रियाचे अन्यो- न्य प्रेम रहात नाही. तसे प्रवृत्तीकडे पहातां पण आयुग्नं च वित्तं च विद्या निधनमेव च पंचैतानि हि मृज्यंते गर्भस्थस्यैव देहिनः॥ आयुप्य, अन्न, वित्त, विद्या, मरण, लाभ, हानि, यश, अपयश, इत्यादिक पुरुषास वश नाहीत त्यास कारण अदृष्टच आहे. ते संचितानुसार गर्भा- वस्थेपासूनच प्राण्याचे बरोबर असतां त्यांत किंचित न्यूनाधीक न होतां आपोआप तसे घडतच असते तरी अभिमानाने मुखाची इच्छा दुःखाचा द्वेष करून अनेक कर्मे आपणावर घेऊन जीव दुःख पावतात. जशी न इच्छिता दुःखे येतात तशी मुखेहि येतात हे सर्वत्रांस प्रत्यक्ष अनुभवित असून विषयभोगार्थ प्रवृत्तीकडे अनेक यत्न करतात व मोक्षार्थ निवृत्तीकडे पहातच नाहीत त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले असे होत आहे. कारण जर अवश्यं भाविभावानां प्रतीकारी भवेद्यदि तदा दुःखैन लिप्येरनलरामयुधिष्ठिराः॥ १ प्रारब्ध.