भात्मविचार. नष्ट होतात. तम्मात् दुःखमय संसारांतून मुक्त होण्याची ज्यांची खरी इच्छा असेल त्यांनी मनेंद्रियें निग्रहून कामादि संपूर्ण विषयवासना त्याग करून, गुरुशास्त्रमार्ग साधनचतुष्टयादिक अंतरंग वर्तन ठेवून प्राणांत प्रसंगीही वेदविहित मार्ग उल्लंघन न करितां आश्रमादिक बाह्याचरण असेल तर तें अति उत्तम द्विगुणित इष्टच होय; पण अंतर्यामी नसतां बाहेर दाखिवणे तें व्यर्थ अशी अविवेक विवेक लक्षणे असून विवेकवैराग्यादि- के सर्व विषयवासना नष्ट होऊन ज्ञानाधिकारप्राप्ति व दृढज्ञाने निजानं- दसुखलाभ होत आहे. प्र०-मनेंद्रियाचा व विषयाचा संबंध अनादि आहे ह्मणजे सतत बहि- मुख विषयाकार रहावे अशीच त्यांची योजना आहे तर ती निर्विषय अंतर्मुख कशी होतील व अन्योन्यसंबंध कसा सुटतो ? सा-मानव अविवेकाने जोपर्यंत ज्या कृत्यांत नफा समजतात तोपर्यंत त्यांत कितीही दुर्दशा झाली तरी परत फिरत नाहीत. तोटा समजला की तत्काल फिरतात तद्वत् विषयेंद्रियांचा संबंध अविचाराने आहे ते विषय. सत्य व सुखप्रद आहेत वा असत्य व दुःखपद आहेत आणि त्यांचा भोक्ता कोण याचा पूर्ण विचारे खचितार्थ झाल्यास धीरवान् पुरुषांची मनेंद्रिय अंतर्मुख होतात व नामरूपी आसक्ति सोडल्याने विषयाचा संबंध सुटतो. जसे सुंदर अमृतफल असून त्यावर सर्प गरळ आहे तर मरण भयाने कोणी त्यास स्पर्श करीत नसते अथवा कोणी स्त्री अत्यंत प्रिय असतां तिचे मन परपुरुषी आहे असे एकदां कळले तर आमरणपर्यंत असतां- ही पूर्व प्रेम रहात नाही किंवा कोणी मनुष्य विषमिश्र अन्न न जाणून निःशंक सेवन करूं लागतो पण यांत विषमिश्र आहे असें एकदां खचित कळले तर कोणी कितीही प्रेरणा केली तरी स्वीकार करीत नाही असे- १ मृत्युपर्यंत.
पान:आत्मविचार.djvu/४०
Appearance