पान:आत्मविचार.djvu/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविनार. पण निर्भय होते. यावरून इंद्रियनय आहे इंद्रयमय नाही या दोघांसही नन वन सारखेच झाले. विवेकी जनांत असून वनांत, अविवेकी वनांत असून ननांत आहे. या प्रकारे अविवेकी यांचे बाह्यविषय मात्र नाहीसे झाले पण अंतर्यामी वासना प्रबल प्रतिष्टित असते तेथे कामादिकांचे विहार आहेच आहे. जो संग टाकून दूर गेला त्याने बाह्यसंग मात्र त्याग केला परंतु वासनेचा त्याग झाला नाही. अशी विषया विनिवर्तते निराहारस्य देहिनः॥ आहारादिक विषयशून्य झालेल्या पुरुषाची इंद्रिये विषयाहून जरी परावृत्त दिसतात तरी त्याची वासना निवृत होत नसते, तीच बाधक आहे एवं बाह्य वेषाने जर मुक्ति होत असती तर नटादिक वेषधारीही मुक्त झाले असते. परंतु मुक्तिर्नास्ति जटाजूटे न काषाये न मुंडने न भस्मनि न कंथायां न दंडे न कमंडलौ ॥ आत्मज्ञानाविना जटाभस्मकाषायमुंडनादिके मुक्ती नाही असा वेदान्त- शास्त्राचा डंका वाजत आहे. याच कारणे ही ब्रह्मविद्या अनधिकाऱ्यास न द्यावी असा प्रतिबंध आहे. जसा परीस स्वस्पर्शाने लोहास हेम करतो पण खापर घासले तर व्यर्थ होतो; किंवा गाईस तृण देताही दुग्ध होते व सर्पास दुग्ध देताही विषच होणार असा पात्रापात्री भेद आहे. तद्वत् ब्रह्मविद्याही होत असते. जसा रसायन देण्यास शुद्ध कोठा असलेला अधिकारी वैद्याने पाहिला पाहिजे, नाहीतर त्या रसायनापासून उलट अपाय होतो किंवा राजदंड, फटकेमार शिक्षा, चांद्रायण व्रत प्राणायामा- दिक प्रायश्चित ही तिन्ही शरीरसंबंधे असतात म्हणून औषध, दंड, प्रायश्चित्त हे अधिकाऱ्याची देशकाल अवस्था स्थिति न पाहतां योजना केली तर त्याचा विपरीत परिणाम होतो. यांत तत्वविद्या पण. प्रायश्चित रूप आहे ती अनधिकाऱ्यास माप्त झाल्यास यथेष्टा चरणी होऊन १ नाहीसे.