पान:आत्मविचार.djvu/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. न नेमिरेवयत्रास्ति रचना तत्र कीदृशी ॥ ज्या रथाचे चक्रास वरुन लोहपट्टी नाही ते चक्र टिकत नसते. तद्वत् विवेकयुक्त सतत दृढवैराग्य नाहीं तेथें ज्ञानही नाही. तस्मात् शुद्धांतःकरण अधिकारीच विरळा. ज्यास मृत्युचे भय खरे कळून जराज- न्मगर्भवासादिक दुःखें विपयदोपदृष्टीने सर्वत्र निराशा झाली तोच खरा मुमुक्ष गुरुशास्त्रमार्ग संसारसमुद्रपार होतो. इतर अनधिकारी अंत- र्यामा विरक्ति नसतां अविवेकानें श्वेपादि कारणे किंवा देहेंद्रियपोषणार्थ उपरोधिक गुरुशिष्यरूपं बनून रजतमकामनेने शास्त्ररीत्या सत्यासत्य त्या- गात्याग यथार्थ न जाणून जगांत भोगप्रतिष्ठादिक वासनेने अनेक प्रका- रची सोंगे मिरवून मनःपूर्वक वर्तन करतात, तो त्यांचा बाह्यात्कारी त्याग होय. आधीच रोग्यास कुपथ्य आवड, त्यावर तसाच अनुमोदन देणारा वैद्य, मग तो रोगी बरा कसा होणार ? अर्थात ज्यास्त रोग होतो मणजे त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ सर्व नाशाचें मूळ नरकद्वार भूत, मुख्य काम, क्रोध, लोभ हे तीनच असून यांचे अंतर्भूत् मोहादिक असतात. कामकिंकरतां प्राप्य स कामी सर्वकिंकरः ।। या कामवासनेचा जो किंकर तो सर्व जगाचा दास नीच होतो व का माची वृद्धि तोच लोभ त्यायोगें प्रातरारभ्य निद्रांतमथस्वप्नपुरेष्वपि परिभ्रमति यदिश्वं स लोभस्य पराक्रमः ॥ प्रातरारम्य निद्रेपर्यंत स्वप्नांतही सर्व विश्व भ्रमण करीत असते आणि असंख्य द्रव्य जवळ असतांहि अति लोभ दुराशेने जसें १ कचित्. २ वैराग्य.