पान:आत्मविचार.djvu/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. अधिक इच्छा करतात. त्या इच्छेस प्रतिबंध होईल तेथे क्रोध येतो. क्रोधा बरोबर मोह आहेच. मोहयोगें बुद्धिभ्रंश, बुद्धिनाशें अद्वातंद्वा वर्तनाने नाश झणजे अज्ञानानें कामवासना, तत्परिणामें क्रोध, क्रोधापासून मोह, त्यापा- सून नाश, एवं हाच प्रमाद. परंपरा विकारें मृत्यु. जसें चोराने कोणी मनुष्याचे नेत्र बांधून अरण्यांत लुटून घेऊन वृक्षाशी बांधून ठेविलें तसे या कामांदीनी सकळ विश्व अज्ञानवनी ज्ञानधन लुदून मोहपाशी नेत्र बांधून दीन दुर्बळ केले आहे. या प्रकारे मनेद्रियें बलिष्ट असन यांचे मूळ वासनाच आहे व वासनेची उत्पत्ति विषयाचे सत्यत्व असून अस- त्यास सत्यत्व बुद्धि हेच स्वस्वरूपी अज्ञान सर्व दुःखाचें मूळ बीज होय. या अज्ञानाचे विरोधी ज्ञान एकच आहे. अन्य उपाय नाही, पण त्यास अवैराग्यामुळे वासना आच्छादित करते यास्तव ज्यास दुःखमय संसारा- चा खरा कंटाळा आला असेल त्याने इंदविवेकवैराग्यबलें संपूर्ण वासना त्याग केली पाहिजे. जसें समुदाययुक्त बलवान शत्रु एकटा वीर स्वल्प यत्नाने वश करण्यास असमर्थ तसे मनेंद्रियकामादिक अतिबली आहेत ते अविवेके, क्षणिक वैराग्य मंदयत्नाने वश होणार नाहीत, तस्मात तज्मयार्थ शमदमववेक वैराग्यादियुक्त गुरुशास्त्रमार्गे महान पुरुषार्थ यत्न केला पाहिजे, तरच ही अज्ञान भ्रान्ति दूर होईल. प्र०-अविवेकवैराग्य व विवेकवैराग्य लक्षण कसे आणि त्यापासून कोणता व कसा उपयोग आहे! स-जसा काही मोठा व्यापार करण्यास आधी मोठे भांडवल जवळ असले पाहिजे, सराफी हुंडीच्या धंद्यास प्रथम बहुत पैसा जवळ असला पाहिजे, तसा तत्वज्ञानास साधनचतुष्टययुक्त शुद्धांतःकरणाधिकारी असला पाहिजे अणजे १ सतत. २ अमा.