Jump to content

पान:आत्मविचार.djvu/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मात्मविचार. तील रज्जूमुळे मिकडे न्यावे तिकडे निमुट चालले जातात तद्वत् वासना- रज्जयोगे अखिल जीव आकर्षित असून अज्ञानरूप घोरतम रात्रींत अने- क कर्मरूपभार घेऊन जन्ममरणरूपनदीप्रवाहीं वहात असतां ज्ञान- सूर्य कधीच उदय होत नाही. तेणेकरून अत्यंत कष्टी होत्साते कर्मप्रवाह- वेगान्वयें अलतुंबीन्यायें वर खाली स्वर्ग नरकी फिरतात. जसें, सूत्रांत मणी असून सूत्रचालनान्वयें खाली वर होतात तसे विषयवासनासूत्रयोगें सर्वविश्व अधोर्ध्व भ्रमण करीत आहे व विषमिश्र अन्न पूर्वी मधुर व शेवट प्राण हरते तसेच सर्व विषय घातक असून यांत पण विषं विषयवैषम्यं न विषं विषमुच्यते जन्मांतरभा विषया.एकदेहहरं विषं ॥ सोमलादिक उग्र विर्षे . भक्षणाने एकच देहनाश करतात व विषय रूप विष तर स्मरणमात्रेच मूर्छित करीत असून वासनासंस्कारे जन्म जन्मांतरी दुःख देतात. जसें सर्पास दुग्ध देताही त्याचे विषच होते तसे इंद्रियांस जो जो विषयभोग अधिक द्यावे तो तो ज्यास्त दुःखाचे साधन होत असून नानिस्तृप्यति काष्टोधैर्नापगाभिश्च सागरः । न कालः सर्वभूतैश्च न तृष्णा भोगसंचयैः ॥ न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्मेव भूय एवाभिवर्धते ।। पन्हि काष्ठादिकें कधीच तृप्त होत नाही; कितीही नवा येवून मिळतां समुद्र तृप्त नसतो; सर्व भूतें भक्षण करूनही काळ तृप्त नाहीं; तसें तृष्णेचे भोगाने शमन होत नाही. तेल तूप घातल्याने अनि शांत होईल काय! पण दहनीय पदार्थ संपल्याने तोही शांत होतो. परंतु इंद्रियांस कितीही विषय मोग मिळाले तरी तृप्ती नसन विषय कमी झाले तर अधिक प्रज्वलित होऊन