पान:आत्मविचार.djvu/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. कुरंगालिपतंगेभमीनास्त्वेकैकशोहताः। सर्वैर्युक्तैरनेफस्तु व्याप्तस्यज्ञा कुतःसुखं ॥ मृग शदश्रवणेच्छे मारले जातात; भ्रमर गंध ग्रहणेच्छेनें दुःखी होतात; पतंग रूपासक्तीमुळे मरण पावनात; गन स्पर्शलुब्धत्वे बंधांत पडून दुःखी होतात; मीन रसलोभास्तव मृत होतात. एवं एकैक विषयाने एकेक ग्रस्त असून ते पांचही विषय मनुष्यदहांत एकत्र झाल; मग त्यांची दशा काय सांगावी ? या विषयवासनेनेच अखिल विश्व मोहपाशी अडकले असून यांत अजानन्माहात्म्यं पतति शलभो दीपदहने । समीनोऽप्यज्ञानाद्वडिशयुतमश्नाति पिशितं । विजानंतोऽप्यते वयभिरविपलजटिलात्। जा नमुंचामः कामानहह गहनो मोहमहिमा । पतंग मीनादिक त्या त्या विषयांत आपला नाश न जाणून पतन पावतात; आणि मनुष्ये तर जाणतात की सर्व विषय विषरूप आहेत व विपभक्षण करतो तो मृत होतो हे म्पष्टच आहे. तथापि शब्दमात्रच जाणत असून विचारचक्षुरहित असल्याने त्या त्या विषयांत पडून जन्ममरणादिक अनंत दुःखें भोगतात. जशी स्त्री गर्भधारणकाळी सुख मानत पण पुढे प्रसूतीच्या मरणोन्मुख यातना किंवा देहांतहि होतो अथवा बचनाग भक्षणसमया मिष्ट लागत असून पुढे तत्काल प्राण घेतो. नमें, मच्छ किंचित् आमिष लालु- चीने मरण पावतात, तशीच सर्वविषयमुखें प्रथम क्षणमात्र सुखावह व अंती केवळ दुःखप्रद असतात. म्हणजे प्रापीत प्रीतिद्वेष, अप्राप्तीत तृष्णा अशी शरीरांतपर्यंत दुःख देतात. जस, मुष्टिमात्र चण्याच्या लोभाने केपी बंधांत पडून परवश दारोदार फिरतात किंवा उंदीर, घुशी धान्याच्या एका कणाकरितां डोंगर उपसतात, अथवा वृषभ महिपोष्टरादिक नाका १ वानर.