पान:आत्मविचार.djvu/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. स्वमहत्वं यथोपेक्ष्य कश्चिद्विप्रो दुरीहया। . अंगीकरोति शूद्रत्वं तथा जीवत्वमीश्वरे ॥ कोगो शुद्ध ब्राह्मण असतां मी शूद्र आहे अशी त्यास भ्रांति होते, किंवा छत्रपति राजा स्वप्नांत दरिद्री होऊन दारोदार भिक्षा मागणे कर्म करतो, यांस स्वस्वरूप स्मरण नाही. तावत् तें तें कर्म करून अनंत क्लेश भोगतात, तशी स्वस्वरूप अभावामुळे मी कर्ता, भोक्ता, मुखी, दुःखी इत्यादि अविवेकाने जीवास भ्रांति झाली आहे. जसें, जल स्वच्छ असून अविचारी हिरवें, काळे म्हणतात, किंवा अति थंडीने पाणी घट्ट होऊन त्या आकारास मीठ, गारा, बर्फ, मौक्तिकादिक नामें देतात; तथापि पाण्याशिवाय दुसरा यत्किचित् ऐवज त्यांत नसून उपाधीने आकारभेद होऊन भिन्न- भिन्न नांवे झाली, तरी सर्व जलच असते. अथवा अग्नीस कोणताच आकार नसतां काष्टादिक जशी उपाधि त्या आकारें भासतो पण तो आकार अग्नीचे रूप नव्हे म्हणून आकार मिथ्या तसें एकच अधिष्ठान आत्मत्वीं मायोपाधियोर्गे देहादि अनेक व्यक्त्या भासतात त्या सर्व मिथ्या असे खरे तत्व न जाणता आहे एक व म्हणतात एक. या नामरूपासच जगत्प्रं. पंच म्हटला आहे. तें नामरूपात्मक सर्वभास मिथ्या असतां सत्य जाणून जसा श्वान आपलेंच प्रतिविम्ब दर्पणांत पाहून अन्य समजून भुंकतो व कष्टी होतो किंवा हत्ती आपलीच प्रतिछाया स्फटिक शिळेत पाहून दुसरा जाणून सवल दंतप्रहारें भग्नदंत होत्साता दुःखी होतो, याचप्रकारे सर्व सृष्टी द्वैतकल्पनेने दुःखी होत आहे, म्हणून या भ्रान्तीचे यथार्थ विवेचन झाले पाहिजे. प्र०-ही भ्रान्ति दूर होण्यास काय साधन? व ते कोणत्या प्रकारे, व कसे आहे ! स०-प्रथम विवेकयुक्त वैराग्यादिकाने विषयवासना समूळ छेदन केली पाहिजे. पंचविषयेच्छेनेच सकल विश्व जन्ममरणप्रवाहीं वहात आहे. १ आकृति.