पान:आत्मविचार.djvu/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. अश्रध्दया हुतं दत्त तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते .. क्षमा, दया, शौच्य, श्रद्धारहित जप, तप, होम, दान, जे में कर्म तें निर्फळ म्हणून त्यास असुरो संपत्ती म्हणतात. अशी ही भक्तीपण त्रिगुणानु- रूप त्रिप्रकारे झाली आहे. यांत भेददृष्टीने मत्सर, हिंसादिक जारण, मारण कामनिक भक्ति, ती तामसी असून, स्वर्गादिक फलकामी भेदभक्ति राजसी होय; आणि ईश्वरकृपार्थ किंवा पापक्षयार्थ अथवा अमुक स्वाश्रमकर्म तें अवश्य केलेच पाहिजे या बुद्धिने निर्हेतुभेदभावे में कर्म केले जाते ते सात्विक होय. या वेगळी चतुर्थ शुद्धसत्व भक्ति आहे. पैकी श्रद्धायुक्त केवळ ईश्वरगुरुकृपार्थ निरहंकार, निहेंतु, शमदमवैराग्यादिक सात्विक क्रियेने भक्ति, ही दैवी संपत्ती होय. त्यावर ईश्वरकृपा होऊन शुद्धांतः- करणाने विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते. ईश्वर स्तुष्यते यस्य स वैराग्यफलं लभेत् । त्या विवेक वैराग्यद्वारे आत्मज्ञान होऊन निजानंद प्राप्तीने जीव बंधांतून मुक्त होतात, ही ईश्वराची खरी देणगी होय. कारण ईश्वराने दि- लेली वस्तु नष्ट न होतां महत्फल देते. त्या वैराग्याची मृढ कुत्सा करून स्वर्गादिक इहपरलोकभोग आपातरमणीय, दुःखमय, नाशवंत, क्षणिक जन्ममरणाचें बीजरूप मिथ्या असतां त्याची इच्छा करतात, ते मायो- वंचित होत. ही ईश्वराची खरी देणगी नाहीं; असे जे वासनिक भक्त ते केवळ याचक असून कार्यार्थ त्यांची उपरोधिक भक्ति असते ह्मणून ते पुण्यफळ भोगांती नष्ट होऊन पुनरावृत्ती पावतात. यास्तव विवेकयुक्तदृदवैराग्यादिकाचे अवश्य प्रयोजन असून तद्योगें आत्मज्ञान व दृढज्ञानेने अज्ञान, भ्रान्तिनिवा. रण, नित्यसुखप्राप्ति असें महदुपयोगी फल आहे. प्र०-भ्रान्ति कोणत्या प्रकारे झाली व त्याचे कारण काय आहे? स०-मूळ हा जीव शुद्ध सच्चिदानंद ईश्वररूप असून १ सत्व रज भमगुण. २ निंदा. ३ हा लोक परलोक ४ पहाण्यासच बरें. ५ डकलेले.