Jump to content

पान:आत्मविचार.djvu/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

___आत्मविचार. अज्ञानाचा, साक्षी ज्ञानरूपच झालास. ज्ञानावांचून अज्ञान कळण्याचा संभवच नाही हे स्पष्टच आहे व देहादिक दृश्यमात्र सर्वजगत् असत्- जडदुःखमयमिथ्या असतां, ज्ञानाज्ञानमिश्रणाने आपले खरे स्वरूप विप्तरून मी सुखी, दुःखी ही भ्रांती तूं अविचाराने आपले ठिकाणी कल्पि- तोस, हे अज्ञानच सर्व दुःखाचें मूळ आहे. ह्मणून त्याचे यथार्थ विवेचन होऊन शुद्धस्वरूपज्ञान झाले पाहिजे आणि विवेचनास व्यसन, श्रद्धा, विवेकयुक्तवैराग्य देवीसंपत्ति असली पाहिजे, तरच सर्वदुःखनिवृत्तीने अक्षयसुख प्राप्त होणार आहे. या ब्रम्हविद्याप्राप्तीविना अन्य कोण- त्याही उपायें सकलदुःखनिवृत्ति नित्यसुखप्राप्ति नाही. प्र०-देवीसंपत्ति वैराग्याचे रूप काय आणि सुखप्रद इहपरलोकभोग त्याग करून प्रत्यक्षकेवलदुःखपर वैराग्याचे संपादन किंनिमित्त; व त्यापासून फल काय? स०-या संसृतिभ्रमणचक्रनिवृत्तीस तत्कारण अज्ञान निवृत्त झाले पाहिजे. अज्ञाननिवृत्तीस यथार्थ स्वस्वरूप ज्ञान झाले पाहिजे. स्वस्वरूप- ज्ञानास चित्तशुद्धीची अपेक्षा असून चित्तशुद्धीस विवेकवैराग्यादिक सत्वगु- णवृत्तीने निष्काम ईश्वर गुरुप्राप्तीच मुख्य होय. जसें, नेत्र असून दीपा- दिक प्रकाश आहे तर सर्व वस्तु स्पष्ट कळतात, तसें शुद्धांतःकरणे अंतरंग भाक्त आहे तरच त्यास ज्ञान होते व ॥ यथा ज्ञानंविना मुक्तिर्नास्त्युपाय शतैरपि । ॥ तथा भक्तिविना ज्ञानं नास्त्युपाय सहस्रतः ॥ ॥ लवणेन यथा हीनं भोजनं न रसावहं। तथा । ॥ भक्तिविना सर्वा सक्रिया निष्फलेरिता॥ ज्ञानाविना मुक्ति नाही, तसें भक्तिविना ज्ञानही नसून लवणरहित अन्न निरस, तद्वत अंतरंग भक्तीवांचून सर्व करणे निष्फळ म्हणजे १ पृथक्करण. २ त्यावांचून चैन न पडणे. ३ निश्चय. ४ संसार, बेचव.