AIN SAX FINAL SMARWARI .AMPin. RUAN HTTEN आत्मविचार. मंगलाचरण. सश्चिदानंद ब्रह्मात्मा-ज्याच्या प्रकाशाने सर्व विश्व भासत आहे; ज्यांत सर्व स्थित आहे; ज्यांत सर्व लीन होते; ज्यापासून शाता, शान, शेय; द्रष्टा, दर्शन, दृश्य, कर्ता, करण, क्रिया ही सिद्ध होतात व ज्या आनंदसमुद्राचे कणिंगेत संपूर्ण विश्व आनंदित आहे त्या सचिदानंदरूप श्रीगुरु परमात्म्यास अनन्यभावे नमस्कार करितो. प्रश्नोत्तरें गुरुशिष्याचं-शंका समाधानरूप. प्रश्न-महाराज, मी केवळ नड, मूढ, अज्ञान, अविद्यावनी, त्रिविधताप जन्ममरणसंसारी अनंतदुःखे अत्यंत भयभीत झालो आहे, तर मी कोण, कसा आणि जगत् काय, ईश्वर कोण व या दुःखोत्पत्तीचें मूळ काय आणि याची निःशेषनिवृत्ति, अक्षय सुखप्राप्ति कोणत्या उपाये कशी केव्हां होते तो प्रकार कथन करून मला ह्या भवचक्रांतून मुक्त करण्यास आपण समर्थ आहांत. मी स्वामिचरणी अनन्यशरण आहे, आज्ञेप्रमाणे करीन, यास्तव माझा तरणोपाय कृपापूर्वक कथन केला पाहिजे. समाधान-हे शिष्य, तूं त्रिकालाबाधित, मचिदानंदब्रह्मनित्यमुक्त ज्ञानरूपच आहेस. अरे, अज्ञान तुला कळते त्याअर्थी तूं त्याहून निराळा १. अध्यात्मादि. २ भूतभविष्य वर्तमान.
पान:आत्मविचार.djvu/२७
Appearance