आत्मविपार. कान फुकणारे, कंठी बांधणारे, शिखासूत्र काढविणारे, खंडज्ञान उपदेशून मोक्ष उधार सांगणारे हे मुख्य नव्हेत. जसा मार्ग जाणता नावाडी नदीपार करितो, न जाणणारा करूं शकत नाही तद्वत् पूर्णज्ञानप्रबोधशक्ति, स्वानु- भवनिद्रिय निर्लोभता अशा गुरूचे स्वरूप ओळखून जो अनन्य होतो तो सकल दुरितदुःखापासून मुक्त होत्साता निरंतर सुखी होतो. डोळा देखणाच आहे तरी सूर्यादिक प्रकाशाविना अंध असतो, नाव नदीपार करणारी आहे तरी नावाड्यावांचून पैलतीरी करीत नाही, तद्वत सद्गुरुकृपा- प्रसादविना सर्व साधने निष्फळ. जसें समलजल गंगेत येऊन मिळतांच निर्मळ गंगारूप होते किंवा चंदनाचे संगतीने कित्येक वृक्ष सुवासिक होतात अथवा नौकेवर जो आला त्यास जाति, कूल, नीच, उंच, बरा, वाईट न पहातां नावाडी पार करितो, तसे गुरुपदी अनन्य त्याचे सर्वार्थ सिद्ध होतात. पण मेवोदकांत दोष नसतां जसें बीज तसा वृक्ष होऊन फळे देतो तद्वत गुरुईश्वरोपास्तीही आपल्या भक्तिभावनेप्रमाणेच फलीभूत होत असते हे चांगले लक्षात ठेवावे. एवं विवेकवैराग्यादिक साधनचतुष्टययुक्त ब्राम्हणच या ज्ञानास पात्र आहे तो श्रद्धायुक्त, विधीपूर्वक, शुद्धांतःकरणानें तनमनधनेशी श्री गुरुपदकमलीं अनन्यशरण होऊन शंकाप्रश्नाचे विवेचनादिक उत्तरी समाधान पावन निःसंदेहपणे परमपुरुषार्थास प्राप्त होत्साता जन्ममरणादिक सर्वदुःखरहित निरतिशयानंदसुखी कृतकृत्य होतो. इति अनुबंधनम् १ अपर्ण. %3-
पान:आत्मविचार.djvu/२६
Appearance