पान:आत्मविचार.djvu/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बहुविषयक शास्त्रअवलोकनाने ज्याची मती अतृप्त त्यास कल्पांतीही ज्ञान सुख नसून चित्ताचे ऐक्यतेत विघ्न मात्र आहे. जर थोरलोकांस यथेच्छ पंच पक्वान्ने शालदुशाले असतात ते गरीबास अप्राप्य ह्मणून त्याने उपाशी रहावें किंवा थंडीने मरावे की काय ? में प्राप्त त्यावरच निर्वाह केला पाहिजे रुचीनां वैचित्र्याजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसिपयसामर्णव इव ॥ समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नदीने अमक्याच मार्गी आले पाहिजे असा काही नेम नसतो तसाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे तथापि गुरुशास्त्रसं- प्रदाययुक्त चालावें. जर समुद्रातील रत्ने घरच्या आडांत मिळाली किंवा गृहसंबंधी वृक्षास कल्पतरुतुल्यफळे आली तर संग्रह करण्यांत प्रत्यवाय आहे की काय ? आयतें नवनीत मिळाल्यास मंथन आयास किमर्थ ? हिरा केरांत सांपडला तथापि परीक्षक अनादर करीत नसतात. गायीचे वर्ण लाल काळ असल तरा दुधाच गाडीत व रगात भंद नसतो. गगा पूर्वकडून किंवा पश्चिमेकटून आली तरी माहात्म्य सारखेच. साखरेचे कारलें केलें ह्मणून त्यांत कटुत्व येत नसते. सुवर्णाचें श्वान केले ह्मणून ते मातीमोला- ने जात नाही. परीक्षक सोने ओळखून स्वीकार करतात तद्वत् संस्कृत प्राकृत भाषेत अर्थ भिन्न नाही. यास्तव स्वहित साधण्याची ज्यांची खरी इच्छा आहे ते या बोलण्याकडे चांगले लक्ष देतील. जसा बीजांत गुप्त असलेला वृक्षच शाखापत्री बाहेर स्पष्ट होतो परंतु वीजांतील वृक्षाने कोणास पोपण विश्रांति होत नसून तोच वाह्यविस्तारें अनेकांस पोपण विश्रांति उपयोगी होतो तद्वत् संस्कृत वीजरूप असून त्याचा एखाद्यास उपयोग होतो तेंच बीज प्राकृतद्वारा विस्तार पावल्याने मंदप्रजिज्ञासु १ श्रम. २ मंदबुद्धि. ३ मोक्षेच्छु सत् स्वरूप जाणणे इच्छिणारा.