पान:आत्मविचार.djvu/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुमुक्षु अधिकान्यास विश्रांतिकर होत आहे. कारण अर्थरूपें संस्कृत प्राकृत एकच आहे. जो नौका करतो तो आपण एकटाच उपभोगी होत नसून स्वतः परपार होऊन इतरांसही परतीरी होण्यास साधनभूत उपकारी होतो तद्वत् प्राचीन कितीक महापुरुषही निरापेक्ष केवल परोपकारार्थ दयालत्वें भवनदी उतरण्यांत वेदांत शास्त्ररूप अनेक नौका स्वानुभवसिद्ध इतरांस उपयोगार्थ करून ठेवल्या आहेत ज्यांचा आश्रय करून गुरुकर्णधारयो- गें अनेकसाधक पार झाले व होतात; त्याच शब्दामृतांतील वागउच्छिष्ट श्रीसद्गुरुमुखापासून मला प्राप्त झाले त्याचा इतर मुमु स उपयोग व्हावा ह्मणून त्याचे प्रेरणेनेच या ग्रंथाची रचना झाली. वास्तव मी जडमूढ अज्ञान यःकश्चित् गांवढळ असून कोणती ही विद्या अवगत नसतां गुरूकृपेनेच ही रचना असून माझें नांव निमित्तमात्र पुढे केले ती सूज्ञविद्वज्जनाचे सेवेत सादर करीत आहे. भ्रमर जसा केतकीच्या कंटकाकडे न पहाना त्यांतील सुगंधमात्र ग्रहण करतो तसें तुहीं यांतील न्यूनाधिकाविषयीं क्षमा करून कृपापूर्वक अवलोकन केल्यास जसे निजबालकाचे बोबडे शव मिष्ट व श्राव्य होतात तसे हे माझें अप्रौढ लेखनही प्रिय होईल. ही विनंती. ग्रंथकर्ता. हा ग्रंथ छापतेवेळी ह्यांतील संस्कृत भाग तपासण्याचे कामी रा. सा. शंकर मोरो रानडे, बी. ए. ह्यांनी बरेच श्रम घेतले त्याजबद्दल ग्रंथकर्ता व ग्रंथप्रकाशकही त्यांचे फार आभारी आहेत. मु. श्रीक्षेत्र चांदोद कर्नाळी, शके १८१७.