पान:आत्मविचार.djvu/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त ध्यानी येऊन जिज्ञासुची चांगली समजूत व्हावी या कारणास्तव केवळ युक्तिपरदृष्टांताने प्राकृत सरळभाषेत प्रश्नोत्तररूपाने रचिले आहे. __ प्राकृतांतही वेदान्तविषयाचे प्राचीन अनेक ग्रन्थ उत्तम सुलभ समजूत होण्यासारखे असून कित्येकांस संस्कृताकडे फार ओढ असते परंतु गुरु- मार्गहीन असून स्वतः समनण्यापुर्ती पण गनी नसतां त्यांतच ट, फ, करून वेळ गमावून आपणही नीट समजले नसतात तत्रापि प्राकृत पहाणेच नाही अशी व्यर्थ आध्यता बाळगून अर्धवट असे कितीक पहाण्यांत येतात ! याम्तव ज्यांस संस्कृतांत चांगली गती आहे त्यास ते योग्य उत्त- म होय पण पुर्ते समजण्याची शक्ति नाही त्याने आपले कार्याकडे लक्ष दे उन प्राकृताचा अव्हेर न केला तर त्यापासून वहत उपयोग होईल. कारण- अनंतशास्त्रं बहु वेदितव्य - v मल्पश्च कालो बवश्व विनाः यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवांबुमिश्रं॥ या जगांत त्रिगुणानुरूपअनेक शास्त्रं असून तत्प्रतिपादित वस्तुही अनंत आहेत व आयुप्य तर अल्प असून त्यांत आधि व्याधि बहुत विघ्ने आहेत ह्मणून साधकानें संस्कृत प्राकृत वाद सोडून हंसवत् वेदअविरुद्ध ग्रन्थाचे सार मात्र ग्रहण करावें. ज्यांत- सारभूतमुपासीत ज्ञानं यत्स्वार्थसाधकम् ज्ञानानां बहुता यैषा योगविघ्नकरी मता ॥ गापल्या अर्थाचें साधनभूत ज्ञान असेल त्याचीच उपासना करणे योग्य.आणि इदं ज्ञेयमिदं ज्ञेयमिति यस्तृपितश्चरेत् असौ कल्पसहस्रषु न ज्ञानसुखमाप्नुयात् ॥