पान:आत्मविचार.djvu/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्मणून या ग्रन्थाचें नांव 'आत्मविचार' ठेविले आहे. तृप्तीचा अनुभव भोज- नाविना येत नसून, अमृतकुंडाचे पाळीवर बसला तरी पान न केले तर व्याधी दूर न होतां अमर होणार नाही, हे लक्षपूर्वक अवलोकनाने ध्यानी येईल. सारांश स्वस्वरूप न जाणणे यासच माया अविद्या अज्ञानादिक नांव असून प्रमाद हाच मृत्यु अनेक पापादिक दुःखास मूळ आहे. ह्मणजे अहं ब्रह्म न जानाति धिक्तंपुरुषकीटकं देहात्मबुद्धिजं पापं न तद्गोवधकोटिभिः मी ब्रह्मात्मा असे सदृढ यथार्थज्ञान ज्यास नाही त्यास कीटवत् श्रुतिशास्र धिक्कार करतात, कारण देहच मी या पापबुद्धीपेक्षां कोटि गोह- त्यादिक पापें पण अधिक नाहीत यास्तव असे दोष येऊ न देण्याची व वेदान्तमार्गे ईश्वरप्राप्ती करूनघेण्याची ज्यांस खरी इच्छा आहे त्यांस अनुबंधप्रकरणी सांगितल्याप्रमाणे अंतर्बाह्यपवित्रत्वाची, शांतिसमाधानाची, चित्तनिर्विषयत्वादिकांची अवश्यकता आहे, त्याऐवजी बाह्यात्कारी ठाणबं- दी अश्वाचें ब्रह्मचर्य काडीमात्रही कामी येणार नाही तस्मात उपरोधि- कपणा सोडून अंतरंग वेदान्तोपदिष्ठवर्तन ठेवून श्रवणमननाभ्यासादिक दृढतर केले पाहिजे तरच त्यांतील सर्वप्रकार क्रमाने कळतील व परिपक्वतेनें अत्यंत मुखलाभ होणार आहे ! __ आत्मज्ञानसंबंधी संस्कृतांत अनेक ग्रंथ आहेत परंतु मंदप्रज्ञमुमुक्षुचा प्रवेश नसतां अतिविस्तारभये समजण्यास बहुत अडचण ती दूर होऊन साधकास सुलभ व्हावे या हेतूनें लघुपुस्तक महानुभवी पुरुषवाक्यसंग्रहसहाय्याने ईश्वरप्रेरणेने तयार केले आहे जे साद्यंतलक्षपूर्वक अवलोकनाने थोडक्यां १ आंतयार.