पान:आत्मविचार.djvu/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋण असेल किंवा काही भार असेल, ते दुःख पुत्र मित्रादिक दूर करूं शकतात पण सुधादिक दुःखास स्वयत्नाविना अन्य निवारण्यास शक्त नाही. पथ्यमौषधसेवा च क्रियते येन रोगिणा आरोग्यसिद्धिदृष्टास्य नान्यानुष्ठितकर्मणा ॥ रोगी औषध व पथ्य स्वतः सेवन करील तरच आरोग्यता पावेल अन्याचे करण्याने नाही. सारांश- तस्मात्सर्व प्रयत्नेन भवबंधविमुक्तये स्वैरेव यत्नः कर्तव्यो रोगादाविध पंडितैः॥ रोगांतून मुक्त होण्यास जसा रोग्यास स्वतःच यत्न करणे योग्य तसा संसारबंध सुटण्यास विवेकी पुरुषाने स्वतःच विचार, यत्न केला पाहिने एवं आपले विचार युक्त साधनाविना- पाताले भूतले स्वर्गे वने वा गिरिकंदरे विचारेण विना जंतुर्नसुखं लभते क्वचित् ॥ पाताळी, भूतळी, स्वर्गी, वनी, गिरीकपाटी मनुष्यास आत्मज्ञान कधीच कोणत्याही उपायें प्राप्त होत नसून ज्ञानावांचून नित्य सुख नाही, परंतु जसा वन्ही किंचित् स्पर्शाने पेट घेतो पण स्पर्श झाला पाहिने किंवा अंधारांतील वस्तु प्रकाशाविना प्राप्त नसून तीच दीपादिकप्रकाशे मिळते ह्मणून प्रकाशच केला पाहिजे त्याविना सर्व उपाय व्यर्थ. तद्वत् स्वहि- तेच्छुने आत्मज्ञानार्थ गुरुशास्त्रमार्गे सत्यासत्य विचारच केला पाहिजे १ कर्न.