पान:आत्मविचार.djvu/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अहन्यहनि भूतानि गच्छंतीह यमालयम् शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ॥ अपक्व घटांतील जळ हळूहळू झरत असते त्याप्रमाणे सूर्यास्तोदयीं आयुष्य क्षीण होत असून नित्य असंख्य जीव मरून यमालयी जातात हे प्रत्यक्ष पहात असतांही आपली अक्षयस्थिती जाणतात याहून अन्य मूर्खत्व व आश्चर्य कोणते ? व्याधी दिवसेंदिवस प्रबल होत असून नो त्याचा उपशम न विचारील तो आपणच आपला वैरी होय. तद्वत् आनची आलेली वेळ उद्यांवर लोटून आह्मीं परमार्थ साध्य करूं असें ने ह्मणतात ते कालनदीत वाहवले जातील आणि हा नरदेह पुन्हा प्राप्त न होतां अती यातायाती भोगाव्या लागतील; जर पुढचा मार्ग भयप्रद कळत आहे तर त्याचा याच मुकामी सावधगिरीचा विचार करून साहाय्यबलाने सूर्यास्तापूर्वी मुक्कामी पांचवेल अशा त्वरेने पाउल उचलले पाहिजे अथवा दीप असेपर्यंत झांकापाक में करणें तें केलें पाहिजे असा सृष्टीत ही व्यवहार आहे, कारण तेल संपले की दीप जाणार मग आपणच ठेवलेली वस्तु अंधारामुळे आपणास मिळत नसते तर दुसरे काय होणार? तस्मात् देहेंद्रिय प्राणादिक स्वस्थता तावत मुमनें स्वाश्रम धर्मकर्म साधनचतुष्टयादिक बलाने आत्मज्ञानार्थ अतितर पुरुषार्थ यत्न केला पाहिजे. आपल्या शिरावर ऋणमोचनकर्तारः पितुः सन्ति सुतादयः बन्धमोचनकर्ता तु स्वस्मादन्यो न कश्चन ॥ मस्तकन्यस्तभारादेवुःखमन्यनिवार्यते क्षुधादिकृतदुःखं तु विना स्वेन न केन च ।