पान:आत्मविचार.djvu/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जरा व्याघ्रीव पुरतस्तजयंत्यवतिष्ठते मृत्युः सहैव यात्येष समयं सप्रतीक्षते ॥ जरा, व्याघ्रीप्रमाणे शरीर भक्षीत असते; रोग, शत्रुवत अहर्निश देहावर प्रहार करतात; मृत्यु, निरंतर देहासमागमेंच रहात असून समया- वधी पहात असतो; इत्यादिकांकडे दुर्लक्ष करून अशाश्वत विषयार्थि रात्रंदिवस धूम खटपटीत निमग्न असतात. अहो, व्याघ्राचे वनांतून एकदा सुरक्षित निघून येणे झाले किंवा सर्पगृहीहून एकदां धनलाभ झाला ह्मणून दुसरे वेळी व्याघ्र सर्प नाहिसे होतात की काय ? शत्रु निद्रिस्थ असल्याने भयच गेले असे होत नाही. कालरूप शत्रु अखंड समयावधी पहात असतो. ज्याने अनंत ब्रह्मांडें मुखीं टाकली. ज्याचें भयें तीनलोक कपित- होतात असे सर्व जग जाणत असून त्याकडे दुर्लक्ष करून तिरास आलेली नाव दाटून बुडवितात, ही मोठी शोचनीय गोष्ट आहे ! जसा शरीरास रोग असून उपचारे आरोग्य न करतां झांकून प्राणान्त प्रसंग आणणे अथवा स्वगृहास अग्नी लागला हे जाणून आपण कवाड लावून स्वस्थ आंत रहाणे तसेंच है ही चातुर्य होय!! जसा एखाद्या वृक्षावर पक्षी माळा करून राहिला असतो त्या वृक्षाचे कोणी छेदन करीत आहे किंवा अग्नी लागला आहे तर त्यावरील गृह दारादिकांचा त्याग करून जो पक्षी निराशेने चालता होतो तो सुखी होतो व जो अविचारें गृहासक्त रहातो तो सर्वस्व नाश पावतो अथवा युद्धप्रसंगी शत्रु सन्मुख असून जो आळसाने मागें पाऊल घेतो तो मारला जातो एवं बलवान शत्रुशी ज्याचे हाडवैर आहे त्याने सदोदीत सावध राहिले पाहिजे तद्वत् कालरूपदुर्धर शत्रु, जसा कोणी पुरूष बलिदा- नार्थ एखादे पशूचे पालन करून शेवटी घात करतो तसा बालयुवाद्य- स्था दाखवून अंती ग्रास करील हे मुमुसून क्षणोक्षणी स्मरण ठेवून तज्ज-