पान:आत्मविचार.djvu/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पापपुण्यसंशयाने दुःखाचे साधन मात्र करून घेतात व अमूल्य देह खर्ची घालतात. देहविचार पहातां पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे शुक्रशोणितापासून प्रथम उत्पत्ति व अंती शून्यरूप ह्मणजे आयती नसून मध्येच गारुडवत् भासतो; ज्यास क्रियाभोगादिकांचा संसर्गही नसतो. जर देहच कर्ता भोक्ता लणावा तर प्राणादिक गेल्यावर देहाकृती पूर्ववत् असून देहाच्या सर्व क्रिया बंद का होतात ? यावरून देहादिक दृश्यमात्र केवळ जड असे स्पष्ट होत आहे. आणि आत्मा निर्गुण, निराकार, यास्तव असंग, अकर्ता, अभोक्ता, असे श्रुति शास्त्रे ह्मणतात. यांत कर्ता, भोक्ता, कोण हेंच मुळी निवडत नसून उगीच सर्वास मी मी ह्मणून जीव उड्या मारतात. जर दुसन्याचे ओझे आपण डोक्यावर घेतले तर भाराने शीण येईल यांत नवल काय ! चोरी न करता मी केली ह्मणतो तो दंड पावतो या प्रकारे वास्तव पहातां सर्व दुःखाचे मूळ एक अभिमानच दिसत आहे, ज्यायोगें जीव आपणावर येऊन विपत्तीत पडतात. एवं देहादि दृश्यमात्र केवळ जड अशाश्वत मुळीच परके केव्हां जाणार याचाही नेम समजत नसतां उत्पन्नापूर्वीच मरणभय लागले असते. जसा सर्प- यथा व्यालगलस्थोपि भेको दंशानपेक्षते नथा कालाहिना ग्रस्तो लोको भोगानशाश्वतान् ।। म्वमुखांत धरलेला बेडूक हळू हळू ग्रास करतो तेवढ्याच अवकाशांत तो वेडूक तेथून मुटण्याचा विचार न पहातां माशा धरतो, तद्वत् सर्व- प्राणी कालमुखीं ग्रस्त असून, १ रेतरक्त.