पान:आत्मविचार.djvu/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न मला खेद होत आहे. याचप्रकारे हे मानवशरीर घटरूप असून यांत श्वासरूप अगणित चिंतामणी आहेत. जसा चिंतामणी सर्वार्थ प्राप्तीकर असतो तसा श्वासयुक्तदेह पुरुषार्थद्वारा सर्वार्थ प्राप्तिकर आहे. ज्या एका श्वासाचे व्यर्थ जाणे समग्रपृथ्वीमोलाने परत मिळत नाही त्याची किंम्मत न जाणून अनादर करून स्त्रीपुत्र धनादिकविषया- र्थ श्वासरूपचिंतामणी जे पुरूष कालरूपगहन नदीप्रवाही खर्ची घालतात ते परलोकी एखादें सत्कर्म, सत्धर्म, सत्संग, केलेल्या श्वासाची किम्मत पडते तेव्हां आमी व्यर्थ आयुष्य गमावलें असें ह्मणून पश्चात्तापाने अति- रुदन करतात. सृष्टीत देहादिकापासून ब्रह्मलोकपर्यंत- यदिदं दृश्यते सर्व राज्यं देहादिकं च यत् यदि सत्यं भवत्तत्र आयासः सफलश्च ते॥ धन, पुत्र, कलत्र, राज्यादिक, ज्या ज्या वस्तु दिसतात त्या त्या सत्य असत्या तर हा प्रपंच आयास सफल झाला असता. परंतु भोगा मेघ वितानस्थविद्युल्लेखेव चंचलाः आयुरप्यग्निसंतप्तलोहस्थजलबिंदुवत् ॥ संपूर्ण वस्तु विद्युद्वत् भासमात्र क्षणिक मिथ्या असून ज्या देहार्य नानाभोग इच्छिणे त्याचे आयुष्य तप्तलोहावर जलबिंदुवत असतें तें सर्व भ्रान्तोने सत्य जाणून भोगास्थेनें मानव महत्क्लेशयुक्त अनेक कर्मे करून १ वीज.