पान:आत्मविचार.djvu/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणीएक शेतकरी आपलें धान्याचे शेत एका गहननदीतीरी लावून त्याचे रक्षणार्थ नित्यशः मृत्तिका खणून तिचे गोळे करून पक्ष्यांवर फेंकीत असे. एकेदिवशी माती खणता खणतां स्थांतून एक चिंतामणी भरलेला घट निघालाते पाहून ह्मणतो आज मला ईश्वराने आयते तयार गोळे दिले तर आज यांवरच शेतराखणी करीन. ह्मणून नित्यक्रमाप्रमाणे ते सर्व मणी पाखरावर फेकून दिले; ते गहननदीजलांत गेले, त्यांतील एक मणी देव- योगें चुकून एकीकडे राहिला होता. दोनप्रहरी त्याची स्त्री त्याजकरितां घराहून भोजन घेऊन आली तिजबरोबर तिचे एक मूल होते ते रडूं लागलें यास्तव तो मणी तिने त्याचे हाती क्रीडेस दिला. पतिभोजनोत्तर ती गृहीं जातां मार्गात एक जव्हेरी उभा होता त्याने तो मणी पाहून तिला विचारलेल्या वस्तूचा तूं दाम काय घेशील. ती स्त्री ह्मणाली माझ्या पतीस घेऊन येते तो सांगेल. असें ह्मणून परत जाऊन त्यास घेऊन आली, त्यास पूर्ववत् प्रश्न केला शेतकरी मणाला; याची किम्मत मला माहीत नाही आप- णच सत्धमाने सांगून द्या. तो वाणी धर्मात्मा होता यास्तव ह्मणाला याचा दाम देण्यास मला सामर्थ्य नाही पण उदईक सूर्योदयापासून अस्तमान- पर्यंत तुझ्याने नेववेल तितकें द्रव्य माझे घराहून घेऊन जा. हे ऐकून तो प्रसन्न होऊन मणी त्यास दिला व कराराप्रमाणे दुसरे दिवशी द्रव्य नेऊं लागला. तो मार्गी येतां जातां अति रुदन करीत आहे असे पाहून कोणी एकाने विचारले अरे तुला बहुत वित्तलाभ झाला. त्याचे सुख न मानून उलट रुदन करतोस याचे काय कारण ? शेतकरी म्हणतो यामण्यासारखे असंख्यमणी मला प्राप्त झाले असून ते मी मूर्खपणाने नदीत फेकून दिले त्यांतील हा एक मणी चुकून राहिला होता. त्याचा एवढा मोठा उपयोग झाला तर जर सर्व असते तर किती उपयोग होता? या पश्चात्तापा- १निरूपण,