पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्ट्रभाषेचे महत्त्व

 कोणतेही राष्ट्र घ्या. त्याला स्वत:चा राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा, राष्ट्रचिन्ह असते. त्याशिवाय ते पूर्ण राष्ट्र होऊच शकत नाही. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज या गोष्टीवर एकमत झाले, पण राष्ट्रभाषेचा प्रश्न आपण भाषा भिन्नतेमुळे सोडवू शकलो नाही. म्हणून गांधीजी नेहमी म्हणायचे, ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा राष्ट्र राँगा है।" राष्ट्रभाषा नसल्याने माझा देश मुका राहिला आहे. देशाला बोलकं करण्यासाठी, त्याला आपल्या भाषेत बोलतं करण्यासाठी गांधीजींनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा म्हणून सुचविले, पण त्या वेळी हिंदी हवी तितकी समृद्ध झाली नव्हती म्हणून तिला संपर्क भाषेचा दर्जा देण्यात आला. ती अधिक समृद्ध व्हावी म्हणून प्रयत्न होत आहेत. पण भाषेचा विकास ही एक मानसिक प्रक्रिया आहे. आपण जोवर मनापासून तिचा स्वीकार करणार नाही, तोवर तिचा विकास केवळ अशक्यच म्हणावा लागेल.
 परकीय भाषेची गुलामगिरी हे दुसरे पारतंत्र्यच असते. त्यातून आपण मुक्त व्हायला हवे. इंग्लंडच्या सीमेपासून अवघ्या तीस मैल अंतरावर असलेला फ्रान्स पहा. फ्रेंच लोक सर्रास आपली भाषा वापरतात. राष्ट्रभाषेचा इतका अभिमान आहे त्यांना की तुम्ही कोणत्याही भाषेत बोला, ते तुमच्याशी फ्रेंचमध्येच बोलतील.

 हिंदी ही आपल्या विभिन्नतेने नटलेल्या देशात एकात्मता आणणारी एकमेव भाषा आहे. तिचा आपण दैनंदिन जीवनात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वापर केला पाहिजे. राष्ट्रभाषा ही सरकारी आदेशाने विकसित होणार नाही. आपण भाषिक गुलामगिरीतून मुक्त होऊन तिला आत्मसात करायला हवे. आज दूरदर्शन, आकाशवाणीसारखी प्रभावी माध्यमे राष्ट्रभाषेच्या विकासासाठी समर्पित झाली आहेत. महात्मा गांधींच्या स्वप्नातील खरा भारत जर आपणास साकार करायला असेल तर हिंदीचा प्रचार व प्रसार व्हायला हवा. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनेपोटी

आकाश संवाद/८९