पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिकले पाहिजे. अनाथ मुले दत्तक घेणे, अनाथ मुलींशी लग्न करणे, अनाथांना नोक-या देणे अशा किती तरी गोष्टी आपल्याला सहज करता येतील. पण आपण नेहमीच शॉर्टकट शोधता असतो. अनाथाश्रमात जाऊन मिठाई वाटली की धन्यता मानणारे किती तरी लोक आहेत. अशा प्रकारची दया दाखवून काय उपयोग? निराधारांना दयेपेक्षा धीराची, पैशापेक्षा प्रेमाची गरज असते हे आपण जाणून घ्यायला हवे. आपले समाजमन अधिक उदार व्हायला हवे असेल तर अनाथ, निराधार मुला-मुलींबद्दल त्यांचे संगोपन, पुनर्वसन करणाच्या संस्थांबद्दल आपण आशा दाखवायला हवी. त्यांच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा. तरच कर्णाप्रमाणे पुरुषार्थी जीवन जगण्याची त्यांना संधी मिळू शकेल. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले" ही संत तुकारामांची शिकवण हा आपला आचारधर्म बनला पाहिजे. तरच ख-या अर्थाने अनाथ, निराधारांसारखे रंजले गांजलेले आपले होतील, सनाथ होतील. विनोबांनी सर्वोदयाची सांगितलेली कल्पना हीच आहे. “सर्वेपि सुखिनः सन्तु' हा आपल्या जीवनाचा आदर्श आहे. अनाथ, निराधार सुखी झाल्याशिवाय सर्वोदय होणार नाही. सर्वोदय हा नव्या जगाचा खरा सूर्योदय आहे. एकविसाव्या शतकाचे ते मागणे आहे.

आकाश संवाद/८८