पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषिक दास्यता जोपासण्यात काय अर्थ आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू सर्वांनी कल्पिलेला भारत राष्ट्रभाषेच्या स्वप्नपूर्तीशिवाय पूर्ण होणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. राष्ट्र हे त्या राष्ट्राच्या जनतेतील राष्ट्रभावनेवर बळकट होत असतं. अशी बळकटी येत असते राष्ट्रभाषेने. भाषा एक झाल्याशिवाय भाव एक होत नाही व राष्ट्र एक व्हायचे तर एक राष्ट्रभाषा हवी. ती समृद्ध करणे आपले कर्तव्य आहे.

आकाश संवाद/९०