पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या संकल्पनेला व्यापक नाव देण्याच्या उद्देशाने साने गुरुजींनी ‘आंतरभारती' शब्दाचा वापर केला. त्याची व्यापकला इतकी होती की कर्नाटकात आण गुजरातमध्ये 'आंतरभारती केंद्र सुरू झाले. या साने गुरुजींनी भारतभर प्रसार केला. इतकेच नव्हे तर साने गुरुजींनी त्या वेळी अनेक भाषांतील साहित्यिकांची व्याख्याने आयोजित केली होती. स्वतः साने गुरुजींनी तुरुंगात असताना तमीळ कवी तिरुवल्लुवर यांचे ‘कुरल' नामक काव्याचा मराठीमध्ये अनुवाद केला होता. इंग्रजीतील पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांनी मराठी भाषिकांना करुन दिला आहे. त्यांची अशी धारण होती की जोवर आपण अन्य भाषा शिकत नाही, अन्य भाषी साहित्य वाचत नाही, तोवर भारत एकात्म होणार नाही.

प्रश्न - सर, मला एक सांगा की मुळात भाषा बंदिस्त स्वरूपामध्ये असते. जसं आपण गडेंचा उल्लेख केला तसा संस्कृत भाषेच्या बाबतीत भारतात सुरुवात त्या अनुवादित गोष्टींची होण्याऐवजी इतर देशात त्याचे तात्काळ अनुवाद करण्याचा प्रयत्न केला गेला. तसा आपणाकडे झाल्याचे दिसते का?

उत्तर - आजही संस्कृत जगातल्या अनेक विद्यापीठात शिकवली जाते. हिंदी जगातल्या १२५ विद्यापीठांमधून शिकवली जाते. आपण आपल्या भाषा व साहित्याचा जितका गंभीर अभ्यास करत नाही त्यापेक्षा अधिक गांभीर्याने तो परदेशात केला जातो. मी एक छोटं उदाहरण आपणास देईन. सन १९९०च्या मे मध्ये फ्रान्स-भारत मैत्री कार्यक्रमांतर्गत फ्रान्सला होतो. तिथं मेट्झ नावाच्या छोट्या गावात एक विद्यापीठ होते. तिथे भारत विद्येचा (इंडॉलॉजी) स्वतंत्र विभाग होता. त्या विभागात एक जर्मन प्राध्यापक संस्कृत शिकवत होते. त्यांनी मला भारतीय म्हणून संस्कृतबद्दल जे प्रश्न विचारले होते, तुमची सर्वांची क्षमा मागून हे सांगेन की मला त्या प्रश्नांची उत्तरे नाही देता आली. आपल्याकडे ‘घर की मुर्गी, दाल बराबर'चा जो भाव आहे, तो आपल्या भाषा व साहित्यसंदर्भात पुरेपूर लागू पडतो. आपण मराठी भाषी असलो तरी मराठी भाषेचे सगळेच आपणाला माहीत असते असे नाही. भारतीय भाषा आणि साहित्याचा आपला पट व्यापक आहे. असे जर कुणी ठरवलं की सगळ्या भारतीय भाषानि साहित्याच्या अभ्यास करीन तर ती अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

आकाश संवाद/१२३