पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रयत्न करायला हवेत. पण दुसरी एक खंत लक्षात घेतली पाहिजे. आपण असे पाहतो - तुम्हीत सातत्याने महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षकांबरोबर काम केले आहे, विद्यापीठ स्तरावर ही तुम्ही अध्यापन केले आहे, मला सांगा की आपल्याकडे विद्या वाचस्पती म्हणजे पीएच.डी. पदवी विद्याथ्र्यांना प्राप्त होते, तेव्हा असे म्हटलं जातं (कदाचित गंमतीने म्हटले जात असेल) की अशा विद्याथ्र्याला त्या विषयाचे सूक्ष्म ज्ञान (मायक्रो नॉलेज) प्राप्त होतं. पण त्याच विषयातल्या इतर प्रश्नांचे भान, ज्ञान, त्याची उकल या विद्याथ्र्यांकडून होत नाही. अशीच परिस्थिती या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वा जागतिक शिक्षणाने निर्माण होणार नाही का?

उत्तर : दोन गोष्टी आहेत. एकीकडे भारत महासत्ता होणार असे आपण मानतो. पूर्वी केव्हातरी भारताबद्दल असं सांगितलं जायचं की ‘भारत हा अविकसित देश आहे', “भारत हा विकसनशील देश आहे' अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारतात नुकतेच आले होते. त्यानी आपल्या भारताला संरक्षणाचा भागीदार देश म्हटले होते, तशी मान्यताही अमेरिकेने भारताला दिली. एकीकडे जागतिक पातळीवर राज्य करायला सरसावलेले आहात. जागतिक नेतृत्व करण्याची तुमची मनीषा निश्चित आहे. आणि क्षमताही आहे. त्या क्षमतांचा विकास तुम्हाला शिक्षणाच्या द्वारेच करावा लागेल. जगात शिक्षणाची विकासाची जी मॉडेल्स आहेत, ज्या नव्या क्षमता मान्य आहेत, त्या नव्या युगाच्या तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना द्याव्याच लागतील.

प्रश्न : या क्षमता जर आपल्या विद्याथ्र्यांना द्यायच्या तर सध्या उपलब्ध असलेली शिक्षण पद्धती, शिक्षण देणा-या संस्था यांचा जर विचार केला तर शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात झालेले व्यावसायिकरण नको का विचारात घ्यायला?

उत्तर : ही आपल्या शिक्षणाची खरी गंभीर समस्या आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला असे वाटते की डॉक्टर जसा महाग व्हायला लागला तसे शिक्षणातील डॉक्टरही महाग व्हायला लागलेत. म्हणजे मी असे म्हणतो की Doctors of Bottles जसे महाग होऊ लागले तसे Doctor of Books ही! म्हणजे आपले जगणे जसे महाग झालं, तसं शिक्षणही! अशा परिस्थितीत जगातल्या देशांनी जे मार्ग चोखाळलेले आहेत त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. सिंगापूरसारखा छोटा देश आहे. तो शिक्षण मोफत' देत नाही, पण ‘माफक दरात शिक्षण देतो. मी असे म्हणणार नाही की एकविसाव्या शतकात शिक्षण मोफत झाले पाहिजे पण ते माफक नक्की असायला हवं या

आकाश संवाद/११४