पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न : या वैश्विक पिढीला शिकवत असताना खूप मोठी जबाबदारी शिक्षक वर्गावर आली आहे. ख-या अर्थाने मुळात शिक्षणाचा झालेला विस्तार, विकास, आजचे प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थी यांची सांगड बसते की बसत नाही?

उत्तर : बसते हे खरे आहे. भारत सरकारने याच वर्षी - २०१६ साली आपले नवं राष्ट्रीय धोरण जाहीर केलंय. त्या नव्या शिक्षण धोरणामध्ये ज्या तीन-चार महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत, सांगितल्या आहेत. त्याकडे मला श्रोत्यांचे लक्ष वेधायचंय आणि शिक्षकांचे पण. भारत सरकार वेगवेगळ्या पद्धतीनी आपल्या देशाला जागतिक व्यासपीठावर न्यायला लागलं आहे. वर्तमान भारत सरकारची अशी इच्छा आहे की आपले शिक्षणदेखील जागतिक दर्जाचे झाले पाहिजे. म्हणून या नव्या धोरणामध्ये 'Internationalization of Education' या शीर्षकाचा स्वतंत्र परिच्छेद, चॅप्टर आहे. म्हणजे आपल्या भारतीय शिक्षणाचे आंतर्राष्ट्रीयकरण करण्याची योजना आहे. शिक्षणाचे आंतर्राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर आज जागतिक पातळीवर जे शिक्षणात प्रगत देश आहेत, ते ज्या पद्धतीने शिक्षण आपल्या देशात विद्याथ्र्यांना देतात, त्या पद्धतीचे शिक्षण आता आपल्याला द्यायचं आहे. एक साधी गोष्ट मी आपणास सांगू इच्छितो. जगामध्ये लहान मुलांना चार-पाच विषयांच्या पलिकडे शिकवले जात नाही. आपल्याकडे हायस्कूलला मुले किती विषय शिकतात हे बघितले तर आपल्या हातापायांची बोटे पुरणार नाहीत इतके विषय आपण त्यांच्या बोकांडी मारतो. ‘बोकांडी' हा शब्द मी मुद्दाम अशासाठी वापरतो की हे विषय त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या माथी मारले जातात. जगात अलिकडे असे सांगितले जाते की कमी विषय मुलांना शिकवा मात्र सूक्ष्मतेने ते शिकवले गेले पाहिजे. आपण भाराभर शिकवतो नि प्रत्यक्षात काहीच सरळ शिकवत नाही अशी आपल्या शिक्षणाची खिचडी झाली आहे. जगामध्ये अलिकडे गणित, इंग्रजी, विज्ञान या तीन विषयाची साक्षरता प्रमाण मानली जाते. त्याचे कारण असे की वर्तमान जीवनामध्ये हे तीन विषय जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून राहिलेले आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना नि नव्या पिढीला या तीन विषयात जर तज्ज्ञ करू शकलात तर ती जगावर राज्य करू शकेल; अशी धारणा त्यामागे आहे.

प्रश्न : सर, एकीकडे तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा दर्जा

आपल्या देशामध्ये टिकावा, त्या पद्धतीचे शिक्षण आपल्या विद्याथ्र्यांना मिळावे म्हणून कमीत कमी विषयांमध्ये पारंगत व्हावेत या दृष्टीने आपण

आकाश संवाद/११३