पान:आकाशगंगा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वधूसंशोधन मित्र :- ६ मित्र :- जाति— भूपतिवैभव तुज गढ्या आवडे कोण सुंदरी फार ? श्रीमंत कुमारी बाप जिचा सरदार ! कवि-वर :- छे ! जरी थोर ती तिला धनाची हांव हटवादी वेडी करूं घेउनी काय ? मित्र :- कवि-वर :- छे ! नको पोर ती शिकणारी अभिमानी - । मग कॉलेजांतिल हवी तुला का तरुणी का सुंदर विधवा सांग गुलाबी राणी ? अन् मुळीं नावडे दुसरी 'सद्गुण-खाणी ' ! मग मराठमोळी हवी तुला का साधी का जनानखान्यांतली बिबी एखादी ? कवि वर :- छे ! खेडवळीला बळे वरावें कोणीं ? मज रुवे न बघण्या 'म्हैस' तशी डोळ्यांनीं ! मग गड्ढ्या ! तुला रे नको वधू का कोणी ? मित्र :- कवि-वर :- ' दे गाणारी मज कवियित्री भाणोनी ' !! - 'नाथा'! पाहुनियां 'स्वयंवर' तुझें, हे होय-'संशोधन ' ! प्रकाशन - सत्यवादी -८१- कवि – 'साधु कीं सैतान' ?