पान:आकाशगंगा.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्रे लिहिलीं तर- - पत्रे तूं लिहिलींस जी प्रियकरा (?) हुळून माझ्यावरी कोठें धाडुं नकोस तीं पण तुला मी सांगतें तें करीं ! त्वनेत्रीं भरले स्वरूप मम हे वेळांत थोड्या जरी- होशी तूं न मला पसंत म्हणुनी, घेते परीक्षा खरी ! वृत्त – शार्दूलविक्रीडित - पत्रांची जमवोनियां सकल जीं ठेवीयलीं बंडलें लावी आग तयांस, तूं न अगदीं पाहून मागें पुढें ! जेव्हां होइल राख पूर्ण सगळी-फासून अंगावर संन्यासी बनुनी तुला गिरिवरी जाणे असे सत्वर ! योग्यांच्यासम तूं समाधि अपुली लावून रात्रंदिनीं एकांतांत बसून ध्यान करणे ! ( माझं कधीं ना मनीं 1 ) आशा वाहुं नकोस ती-' मिळुनियां गेली सुभद्रा जरी- अर्जुनास;' -तरी तुला न दिसणे मद्देह जन्मांतरीं !! प्रकाशन-वसुंधरा -- ८०-