पान:आकाशगंगा.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खगांचें गाम तें जाई दिगंतीं व्यापुनी सर्व अहा ! कान पडूनी तें मिळे आनंद स्वर्गीय ! सुखाचें स्थान हें ऐसे गमे सोडून ना जावें रमूनी सृष्टिसौंदर्यी सदा सत्काव्य निर्मावें ! मनीषा अंतरींची ही यशस्वी व्हावया खास कृपा तूं शारदे ! दावीं तुझ्या ह्या लीन दासास ! कृपादृष्टी तुझी होतां कशाचें ना मला न्यून रचूनी सृष्टिचीं गाणीं जनांना वेड लावीन !! प्रकाशन - सत्यवादी - - ७९- - -