पान:आकाशगंगा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कवि हा सृष्टीचा गवई वृत्त-वसन्त निसर्गाच्या निवाश्याचें खुलें जें स्थान सुखदायी तिथें ये शारदामाई !- कवी हा सृष्टिचा गवई ! जिवाला स्वास्थ्य ना लाभे कुठें गांवांत राहून खळांच्या दुष्ट संसर्गे जहालों पार हैराण ! सुखाचा शब्द बोलाया मिळेना एकही प्राणी मला जो भेटतो कोणी जिव्हारीं घाव तो हाणी ! मुळाशीं देन्य हैं माझं कुणाला दोष देऊं मी ? रहावें दूर एकांतीं गढ़नी आपुल्या कामीं ! कुणाचा जाच ना व्हावा म्हणूनी येथ मी आलों खरें सौंदर्य सृष्टीचें बघूनी अंतरीं घालों ! जिवाला पूर्ण विश्रांती कराया सृष्टिचं गान वनीं स्वच्छंद रमतांना कशाचें ना उरे भान ! खळाळा सारखी वाहे नदी ही स्वच्छ पाण्यानें तिच्या कांठांस जोमानें वसंती बहरलीं रानें ! लता झाडे पहा सारीं कशी फोफावुनी जाती फुलांच्या विविध रंगांनी भरे डोळ्यांत तत्कांती ! भरारा वाहतो वारा नव्या जोमांत येऊन हताशी चित्तवृत्तीला झणीं टाकी विकासून ! - ७८- -