पान:आकाशगंगा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्फूर्ती दाटुनि जेधवां लिहित मी एकांति काव्यें- कथा येते झोंप कुठन ?-रात्र न कळे होते कितीशी तदा ! अर्धी रात्र सरे; म्हणे-'अजुनि हा का नाद नाहीं पुरे ? घ्या ना झोंप अतां तुम्हांस्तव किती जागून काढूं बरें ? घेऊनी श्रम, काळजी मम करी दासी न ती स्वामिनी देई सौख्य मला अलौकिक खरें संसारयात्रेंतुनी ! प्रेमें मद्हृदयामधील अखिल प्रेमां तिनें जिंकलें दिग्य प्रेम असें जगीं मिळत ना कोठें जरी धुंडलं !! प्रकाशन - विहार - ७७ -