पान:आकाशगंगा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पत्नी-प्रेम-विहार पत्नीच्या हृदयीं कसें वसतसे सत्प्रेम अव्याहत ? त्याचे गृढ कुठे, कशांत भरलें, नाहीं मुळीं माहित ! नेत्रां तें न दिसे संदेव म्हणुनी का आंधळे भासतें ? वेर्डे वा म्हणतांच का उलट तें वेडावुनी टाकितें ? ऋच--शार्दूलविक्रीडित • कामाला मजला उठीव सखये ! मोठ्या पहांटे तरी ' जेव्हां मी तिज सांगुनी पहुडतों रात्री सुशय्येवरी ! साडेपांचहि वाजतात न कुठें बोले प्रिया स्पर्शुनी- 'नाथा ! झोंप पुरे-चहा पिउनि हा, ध्या स्नान आटोपुनी ! पोरांचे करण्यांत कौतुक तसे पत्नीसवें गुंजन ! जाते लोटुनि ती सकाळ सगळीं कार्मे तशीं राहुन ! जेवाया मज घालुनी मग विडा देऊन ती बोलते- ‘ जा जा लौकर ऑफिसांत, तुमचें ना लक्ष गुंतो इथें ! - - ७६ - कामाच्या अगदी ढिगांत बुडुनी जातां कचेरीत मी सुट्टी होउनि स्व-गृहों परततां दारांत कांता उभी ! बोले-'वाट बघन मीच थकलं आतां करूं जेवण, आहे सुंदरशी हवा वितरली येऊं चला हिंडुन '! - -