पान:आकाशगंगा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- स - चाल - सुरेख संगम किती - ह्या जगांत प्रेमाविना। सखे ग मला न कांहीं दिसे ! ॥ ध्रु० ॥ हा पहा जलाचा झरा वाहतो कसा झरझरा निज प्रेम-गान उधळीत भेटण्या नदीस शोधीतसे ! ती नदी तशी गिरिंतुनी धडधडा धांव घेउनी मुरकून मारते मिठी सागरा-जडून कसलें पिसें ? गिरि-शिखा किती उंचशा अप्सरा महीच्या जशा आलिंगन द्याया नभा चालल्या नटूनि किति राजसें ! भूवरी लता ही सदा होतसे तरूवर फिदा अन् नमांत विद्युल्लता-ढगांसह नृत्य करूनी हंसे ! पौर्णिमा-प्रभा पाहुनी गर्जतो सिंधु उफळुनी ये भरति कशाची ? हृदीं तयाच्या प्रेमभाव ना वसे ?. - ६८- -