पान:आकाशगंगा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अविवाहित राहिलों जर- - दुर्दैवें जर यौवनांत पडलों मी मात्र लग्नाविना पापी मार्ग मला चुकून धरण्या होईल ती वासना ! सान्निध्यांत जिच्या सदा हरपुनी जातील त्या जाचण्या प्रीतीची मज लाभणार न कळी कोठें कधीं हुंगण्या ! दांपत्यें दिसती कितीक भंवतीं ह्रीं स्वैर संचारती ललिा प्रेमळ ज्यांचिया बघुनि कां हापापते मन्मती ? संसारीं सगळे सदोदित सुखी-दुःखांत मी एकला इच्छेवांचुनि यौवनांत मज कां संन्यास ओढावला ? प्रकाशन - विहार - सिंधूला सरिता, तरूस लतिका, मेघास विद्युल्लता सूर्याला वसुधा, सुधांशुस निशा, देवासही देवता ! सृष्टीची युगुलें सुख विहरती पाहून त्यां मी सुरें नाहीं प्रीय सखी तरी रिझवुं मी कैसा जिवाला बरें ?

" , - 'देवा ! मृत्यु नको'- वदेल कुणिही-' संसारप्रेमामुळे ' 'देवा आयु नको' म्हणेन- मजला ह्या ब्रह्मचर्यातलें !! वृत्त—शार्दूलविक्रीडित 6 - ६६ - - -