पान:आकाशगंगा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कशाला बरें दोष दैवास द्यावा किती भोग हा नित्य भोगीत जावा ? जिवापाड हे केश शांती न जीवा किती अंत तूं पाहली सांग देवा ? दयाळू तुला बोलती दीननाथा कसा तूं मला होसि निष्ठुर आतां ? तुवां ऐकिले बोल, जे भक्त त्यांचे तुझा दास मी मागणे ऐक माझें ! नको वाढवूं आयुची रेघ माझी पुरे जाहली जांचणी ह्या जगींची ! जिवाला न आशा कशाचीच राही कधीं मृत्यु येईल मी वाट पाहीं ! टळेना जगीं मृत्यु कांहीं कुणाला तसे टाळतां येत नाहीं तयाला ! - म्हणोनी तुला मागणें हेंच देवा- ‘मला दे झणीं मृत्युचा गोड ठेवा !" सदरहू कविता 'सत्यवादी ' ता. २४-१-१९३४ च्या अंकांत प्रसिद्ध झाली होती. परंतु हीच कविता श्री. बाबू विठोबा पवार, जत, यांनो ता. २०-४-१९३५ च्या 'विद्याविलासां' त 'दारिद्र्यनवमी' हा नवीन मथळा देऊन ती बहुतेक जशीच्या तशीच आपल्या नावाखाली दडपली होती. संभावित चोरांनीं आतां कविताही ‘लंबे' करण्याचा कट केला आहे की काय ? 6 प्रकाशन- सत्यवादी - ६५- -