पान:आकाशगंगा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एका गरीबाचें मागणे नको ह्या जगीं राहणें यापुढें तें जिवा दुःख मोठें, नसे सौख्य कोठें ! मना जाळते रोज चिंता विषारी कशी वेळ ती भागवावी दुपारीं ? अहोरात्र हिंडून भिक्षा न हातीं लुळा पांगळा मी सदा अर्धपोटीं ! पुरेसें कुठें वस्त्र अंगावरी ह्या ? जरी ताप थंडी असे ताप द्याया ! जगीं एक मी; ना मला बाप, आई मिळे प्रेमवात्सल्य ना सौख्यदायी ! दिसेना कुठें ना एक पैसा कसा तो कशाला विचारावया मित्र येतो ? जगाचा पुरा वीट आला जिवाला कळेना असे जन्म माझा कशाला ? स्वहार्ते महत्कार्य कांहीं घडेना करी दुष्ट हा काल सर्वत्र दैना ! कसे स्वार्थधुंदीत श्रीमंत मेले ? कुणी आज दीनांस वाली न ठेले ! न हातून त्यांच्या मिळे दान कांहीं परंतू शिव्या खावया वेळ येई ! - ६४ - - - राग — मालकंस