पान:आकाशगंगा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तात्या पंतोजी वृत्त - शार्दूलविक्रीडित आठ वर्षीच्या कोमल बालविधवेला पाहून एका प्रोफेसरसाहेबांच्या मनाला एकाएक चरका बसला ! आमच्या खेडेगांवांतील तात्या पंतोजींनी शाळा तपासण्या- साठी आलेल्या एका अनपेक्षित व निष्ठुर अशा परीक्षकाला ( Inspector ) पाह- तांच त्यांच्याही मनाला एकाएकी भयंकर धक्का बसला ! सहृदय रसिकांनी ' ह्या दोघांत कोणाच्या मनाला जास्त हिसका बसला '-याची आवश्यकता भासल्यास जरूर तो काथ्याकूट आपापल्या कंपूंत करावा ! होती वेळ दुपारची कडक ती कंटाळवाणी जिवा होती बेफिकिरी मुलें मजपुढे अभ्यास तो ध्यावया ! त्यांच्या मथ्थड बुद्धिला पढवितां नाराज मी होउनी गेलों विस्मरुनी तयां शिकविणे, झोपेमधे गुंगुनी ! गर्जे मी उठुनी मधेंच कितिदां-'शिस्तीमधें वागण्या अभ्यासावरुनी उडून मन घे त्यांचे परी खेळण्या इत्ती जात असे मुकाट स्व-पथीं कुत्री जरी भुंकुन तेवीं सान मुलांस नाकळुनियां मी चालवीं शिक्षण ! एकाकीं इतुक्यांत कोणि मजला बाहेर हांकारिलें माझ्या स्वप्नसमाधिंतून मजला भानावरी आणिलें ! गेलों बाहिर तो भयंकर अती धक्का मना बैसला शाळेला बघण्या ' परीक्षक ' कुणी दैत्यापरी ठाकला ! शोभा तो करणार खास म्हणुनी, अंगीं भरे कांपरें 'एकाकी अवलोकन मन पहा होते किती घाबरें ! 6 प्रकाशन – विविधवृत्त - - ६३ - - -