पान:आकाशगंगा.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यशाचा मार्ग संकटें सदोदित मजपुढती दिसणार यशाचा मार्ग कधीं ? ॥ ध्रु० ॥ यौवन माझे रसरसणारें तडफेचें तें पिउनी वारें जरि क्रांतीचे उडवि फवारे कां बंधन पडतें त्यांवरती ? अथांग दुधडी सरिता वाही बंधारा तिज थोपुनि ठेवी आकांक्षा मन्मनिची तेवी पोंचतें न पूर्णत्वा अगदीं ! वादळ दर्यावरती होतें तारूं तेव्हां स्वैर भटकतें मन्मन वेडें तैसें भ्रमतें जर करील कोणी मज बंदी! जाति -प्रणयप्रभा वृत्ती माझी स्वतंत्रतेची कशास नाहीं डरावयाची ब्याद परंत परतंत्र्याची जाळतें जिवाला, त्या न मिती ! - ६१- - -